तेलंगणामध्ये एमआयएमला मोठा दणका! काँग्रेसची आघाडी कायम
Big blow to MIM in Telangana! Congress lead remains

तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. यानंतर आज (3 डिसेंबर) मतमोजणी होणार आहे.
विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये असं दिसून येतंय की यावेळी केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला काँग्रेस धोबीपछाड देऊ शकेल.
मात्र, बीआरएस (BRS) पक्षाने गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवली आहे. त्यामुळे आता नेमकं कोण कुणावर मात देतं हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे..
सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत समोर आलेल्या कलांनुसार कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहे ते पाहूयात. इलेक्शन कमिशनने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अचामपेट मतदारसंघात काँग्रेसचे चिक्कुडू कृष्णा हे आघाडीवर आहेत. तर भारत राष्ट्र समितीचे बालाराजू हे पिछाडीवर आहेत.
आदिलाबाद मतदारसंघात भाजपचे पयाल शंकर हे आघाडीवर आहेत, तर भारत राष्ट्र समितीचे जोगू रामन्ना एक हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
चंद्रयाणगुट्टा मतदारसंघात एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी आघाडीवर आहेत. तर भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर आहेत.
सिर्सिला मतदारसंघातून केसीआर यांचे पुत्र केटीआर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे के.के. महेंद्र रेड्डी हे पिछाडीवर आहेत.
सिद्दिपेट मतदारसंघात बीआरएसचे थन्नेरू हरीश राव हे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे पूजाला हरी कृष्णा पिछाडीवर आहेत.
गजवेल मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री केसीआर आघाडीवर आहेत. याठिकाणी भाजपचे इटाला राजेंद्र हे पिछाडीवर आहेत.
कामारेड्डी मतदारसंघात काँग्रेसचे रेवंथ रेड्डी हे आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे रेड्डी आहेत. तर मुख्यमंत्री केसीआर हे तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.
तेलंगणामध्ये भाजप सध्या 10 जागांवर आघाडीवर आहे. तर एमआयएम केवळ 4 जागांवर पुढे आहे. काँग्रेसने आपली 66 जागांवरील आघाडी कायम ठेवली असून, बीआरएस सध्या 39 जागांवर पुढे आहे.
उमेदवारांचा घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने हैदराबादमधील हॉटेलबाहेर बसेस तैनात ठेवल्या आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता या बसेसची गरज भासणार नाही. आम्ही सुमारे 80 जागांवर आरामात विजय मिळवू अशी खात्री काँग्रेसने व्यक्त केली आहे.
कामारेड्डी मतदारसंघात केसीआर यांना मोठा धक्का बसला आहे. केसीआर हे तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. याठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रेवंत रेड्डी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला आहे. सध्या काँग्रेस 65 ठिकाणी आघाडीवर आहे. बीआरएस सध्या 45 जागांवर पुढे असून, भाजपने आघाडी घेतलेल्या जागा कमी झाल्या आहेत. एमआयएम सध्या 5 जागांवर पुढे आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेस सध्या 60 जागांवर पुढे आहे. “आम्ही लोकांची नस पकडली, आणि त्यामुळेच यंदा मोठा बदल घडून येणार असा विश्वास आम्हाला होता. मी गेल्या वर्षभरापासून म्हणत आहे की विजय आमचाच असेल, आणि तेच होतं आहे” असं मत काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी व्यक्त केलं आहे.
तेलंगणामध्ये बीआरएस पुन्हा एकदा शर्यतीत आलं आहे. काँग्रेस सध्या 59 जागांवर पुढे आहे, तर बीआरएस त्यापेक्षा केवळ 10 जागांंनी मागे आहे. काँग्रेस बहुमताच्या आकड्यापासून दूर जात असतानाच भाजप आणि एमआयएमच्या जागाही वाढल्या आहेत. त्यामुळे तेलंगणामध्ये हे छोटे पक्ष किंगमेकर ठरू शकतात.
“तेलंगणातील लोकांना बदल हवा होता. बीआरएसच्या भ्रष्ट सरकारला इथली जनता कंटाळली होती. सध्या काँग्रेस बऱ्याच ठिकाणी आघाडीवर आहे, मात्र तेलंंगणामध्ये भाजप देखील महत्त्वाचा पक्ष ठरणार आहे” असं मत भाजप खासदार के लक्ष्मण यांनी व्यक्त केलं.
तेलंगणामधील मतमोजणीच्या पहिल्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. बीआरएस 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप आणि एमआयएम हे प्रत्येकी 5 जागांवर पुढे आहेत.
काँग्रेस प्रमुखांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, आघाडीवर आहेत रेवंथ रेड्डी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हे आपल्या मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांच्या घराबाहेर आतापासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. या निवडणुकीत आपण विजय मिळवू अशी पूर्ण खात्री काँग्रेसला आहे. पहिल्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे.
तेलंगणामध्ये एमआयएम सध्या 7 जागांवर पुढे आहे. अकबरुद्दीन ओवैसी हे आपल्या मतदारसंघातून आघाडीवर आहे.हैदराबादमधील ताज कृष्णा हॉटेलबाहेर सध्या लक्झरी बसेस आणल्या आहेत. विजयी उमेदवारांना हलवण्यासाठी या बसेसचा वापर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याच ठिकाणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार देखील दाखल झाले आहेत.
तेलंगणामध्ये धक्कादायक परिस्थिती पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री केसीआर हे दोन्ही मतदारसंघांमध्ये पिछाडीवर आहेत. ते गजवेल आणि कामारेड्डी मतदारसंंघांमध्ये उभे आहेत. सध्या काँग्रेस 65 जागांवर पुढे आहे, तर भाजप 5 जागांवर पुढे आहे. बीआरएस केवळ 40 जागांवर पुढे आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेसने पहिल्या कलामध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. विजयाच्या विश्वासामुळे आता घोडेबाजार रोखण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे. यासाठीच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. ते कर्नाटकातील काही आमदारांच्या मदतीने निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.
मुख्यमंत्री केसीआर हे गजवेल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर कामारेड्डीमधून पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे रेवंत रेड्डी हे कामारेड्डी आणि कोदंगल या दोन्ही ठिकाणी आघाडीवर आहेत.
काँग्रेसने तेलंगणामध्ये 60 जागांवर आघाडी मिळवली आहे. बीआरएस हे केवळ 33 जागांवर पुढे आहे. तर भाजप अजूनही कअवघ्या तीन जागांवर पुढे आहे. एमआयएमने 6 जागांवर मुसंडी मारली आहे.काँग्रेस सध्या 55 जागांवर पुढे आहे, तर बीआरएस केवळ 35 जागांवर पुढे आहे. भाजपने आता 3 जागांवर आघाडी मिळवली आहे. एमआयएम आणि इतर हे अनुक्रमे 2 आणि 3 जागांवर पुढे आहेत.
कामारेड्डी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री केसीआर आघाडीवर आहेत, तर सिरसिल्ला मतदारसंघात त्यांचे पुत्र केटीआर हेदेखील आघाडीवर आहेत.तेलंगणामध्ये अखेर भाजप शर्यतीत आलं आहे. राज्यात बीआरएस सध्या 26 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 30 जागांवर पुढे आहे. तर एमआयएम आणि भाजप हे प्रत्येकी दोन जागांवर आघाडीवर आहेत.
तेलंगणामध्ये आता बीआरएसने 25 जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस सध्या 27 जागांवर पुढे आहे, तर एमआयएम 2 जागांवर पुढे आहे.तेलंगणामध्ये काँग्रेसने आता 25 जागांवर आघाडी मिळवली आहे. याठिकाणी बीआरएस 20 जागांवर पुढे आहे, तर एमआयएम एका जागेवर पुढे आहे. भाजप अद्याप एकाही जागेवर पुढे नाही.
तेलंगणामध्ये काँग्रेस आणि बीआरएसमध्ये टक्कर पहायला मिळत आहे. याठिकाणी सध्या बीआरएस 18 तर काँग्रेस 17 जागांवर पुढे आहे. भाजपला अजून एकाही जागेवर आघाडी मिळवता आली नाहीये.राज्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये BRS 12 जागांवर पुढे असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएमला एका जागेवर आघाडी मिळाली आहे.
एक्झिट पोलप्रमाणेच आम्ही सुमारे 70 जागा मिळवू असा विश्वास तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे.तेलंगणातील वारांगळ येथील मतमोजणी केंद्रांवर पोस्टल बॅलट आणण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे हैदराबाद येथील मतमोजणी केंद्राबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
भारत राष्ट्र समिती, म्हणजेच बीआरएस नेते दसोजू श्रवण कुमार यांनी याही वेळी आपणच सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की एक्झिट पोल आणि खरे निकाल यात बऱ्याच वेळा फरक दिसतो. बीआरएसला नक्कीच 70 जागा मिळतील, आणि केसीआर तिसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री होतील असंही ते म्हणाले.