राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट;हवामान विभागाचा अलर्ट
Unseasonal rain crisis again in the state

महाराष्ट्रातून मान्सूननं माघार घेऊन आता हिवाळ्याचेही काही महिने सरलेले असताना हा पाऊस काही पाठ सोडताना दिसत नाही आहे. मोसमी पावसाचे वारे परतले असले तरीही
मागील काही महिन्यांपासून अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं सत्र सुरु झालं.
त्यातच आका बंगालच्या उपसागरामध्ये मिचौंग चक्रीवादळाची निर्मिती होत असल्यांमुळं परिणामस्वरुप महाराष्ट्रातील तापमानात अनेक चढउतार होताना दिसत आहेत.
हवमान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसू शकतो. तर, उत्तर महाराष्ट्रावर काळ्या ढगांचं सावट असणार आहे. मुख्यत्वे राज्यातील तापमानात यामुळं कमालीची अस्थिरता पाहता येणार आहे.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आता कुठे राज्याच्या काही भागांमध्ये हिवाळा जम धरताना दिसत होता. पण, पावसाची ये-जा सुरुच असल्यामुळं तापमानावर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत.
तिथं महाबळेश्वरमध्येही तापमानात काहीशी वाढ झाली असून, ते 15 ते 16 अंशांच्या घरात पोहोचलं आहे. दरम्यान सध्या या साऱ्यामध्ये राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांवर दाट धुक्याची चादर असल्यामुळं पहाटे आणि सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी असल्याचं पाहायला मिळत आहे.
सातत्यानं परिणाम दाखवणाऱ्या अल निनोचा आशिया खंडावर सर्वाधिक वाइट परिणाम होत असून, त्याचा जास्त तडाखा भारताला बसत आहे. ज्यामुळं यंदाचं पर्जन्यमान तर प्रभावित झालं पण,
आता हिवाळ्यावरही याचे नकारात्मक परिणाम होताना दिसणार आहेत. प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले. थंडीदेखील कमी राहणार आहे.
भारतीय महासागरीय डी-ध्रुविता अल निनोवर फारसा परिणाम करु शकली नाही. परिणामी थंडीचं प्रमाण सरासरीइतकंच असेल असं सांगण्यात येत आहे.
हवामान विभागानं देश पातळीवर वर्तवलेल्या अंदाजामध्येही बरेच चढऊतार पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये तामिळनाडूचा दक्षिण पट्टा, आंध्र प्रदेशचा अंतर्गत भाग आणि ओडिशा, छत्तीसगढचा मोठा भाग पावसानं प्रभावित होऊ शकतो.
तर, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लेड लडाख प्रांत आणि उत्तराखंडमध्ये थंडीचा कडाका वाढेल. श्रीनगरमध्ये पावसाची रिमझिम असल्यामुळं हवेत गारवा वाढणार आहे. तर, या भागांमधील पर्वतीय क्षेत्रांवर शीतलहरी कायम राहतील.
बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झालं आहे. उद्या म्हणजे ५ डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मिचौंग चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. मात्र, चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर बाष्प असल्याने पुढील ३ ते ४ दिवसात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात, तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मिचौंग चक्रीवादळामुळे केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील १२ जिल्हा प्रशासनसोबत बैठक घेत खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी बैठक घेत आढावा घेतला आहे.
मिचौंग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. IMD कडून तामिळनाडूमधील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.