मराठवाड्यात दुपारनंतर या दोन जिल्ह्याना उष्णतेचे नवे संकट
New heat wave in Marathwada after afternoon for these two districts,

महाराष्ट्रासह मराठवाड्यात उन्हाची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज दुपारी विशेष उकाडा जाणवणार असून काही भागात हीट वेव्हसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे आणि भरपूर पाणी प्यावे, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.
बीड जिल्ह्यात 20 एप्रिल रोजी कमाल तापमान सुमारे 41°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि किमान तापमान 25°C च्या आसपास राहणार आहे.
आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहील पण दुपारनंतर गरम वाऱ्यांची शक्यता आहे. 21 एप्रिल आणि पुढचे 2-3 दिवस तापमान 41-42°C दरम्यान राहील. उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
लातूर जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढणार आहे. 20 एप्रिलला कमाल तापमान सुमारे 40°C आणि किमान तापमान 24°C इतके राहण्याचा अंदाज आहे.
आकाश स्वच्छ आणि वाऱ्याचा वेग थोडकाच असेल. 21 एप्रिलनंतर तापमान 40-41°C दरम्यान राहील. उष्णतेमुळे थकवा येण्याची शक्यता असल्याने पाण्याचे सेवन वाढविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात 20 एप्रिल रोजी कमाल तापमान 41°C तर किमान 27°C राहणार आहे. दिवसभर ऊन प्रखर राहणार असून दुपारच्या वेळेत उष्णता अधिक जाणवेल.
21 एप्रिलपासून पुढील काही दिवस तापमान 41-42°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे शारीरिक त्रास होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
नांदेड जिल्ह्यात 20 एप्रिलला सर्वात जास्त उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 43°C तर किमान तापमान 26°C असेल. हवामान प्रखर उष्ण आणि कोरडे राहील.
21 एप्रिलनंतरही उष्णतेची तीव्रता कायम राहून तापमान 43-44°C दरम्यान राहणार आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी सावधगिरी बाळगावी व अत्यावश्यक नसल्यास बाहेर जाणे टाळावे.
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून बहुतांश ठिकाणी उष्णतेचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. मराठवाड्यात देखील हीच स्थिती कायम आहे. पुढील काही दिवसांत उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान एप्रिलमधील उच्चांकी 42 अंशांवर गेलं आहे. आज देखील कमाल तापमान 42 तर किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
बीड आणि हिंगोलीमध्ये देखील तापमानाचा पारा 42 अंशांवर राहणार आहे. तर जालन्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांत देखील तापमानात सातत्याने वाढ होत आहे.
परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे 44 अंश सेल्सिअस असेल. या दोन जिल्ह्यांमध्ये देखील एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणामध्ये तापमानात वाढ झालेली आहे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यासोबत शेतकऱ्यांना देखील शेतातील कामे दुपारच्या वेळी करणे टाळावा.