महाराष्ट्रातील या शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस;पुढील २४ तासांत ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार

Heavy rain in this city of Maharashtra since morning

 

 

 

राज्याच्या काही भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. काही शहरांमध्ये थंडी वाढू लागली आहे. तर पहाटेपासून थंडी तर दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत आहे.

 

 

 

अशातच, राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

 

 

 

नोव्हेंबर महिना सुरू होऊन आठवडा उलटला असला तरी राज्यात अद्याप उकाडा जाणवत आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरपर्यंत

 

 

 

हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पहाटेपासून कोल्हापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

 

 

 

कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात गेल्या 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसत आहे.

 

 

 

सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 10 नोव्हेंबरपासून थंडीत वाढ होईल, असा अंदाज आहे.

 

 

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

बुधवारी पहाटेपासूनच कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी खरीप हंगामातील पीके झाकून ठेवण्यासाठी शेताकडे धाव घेतली.

 

 

 

मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं. आज म्हणजेच बुधवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापुरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ऐन खरीप हंगामातील पीके काढणीला आली असताना अवकाळीचं संकट येऊन ठेपल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

 

 

 

 

दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पीकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे. अरबी समुद्रात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.

 

 

 

 

सध्या केरळ व तमिळनाडू राज्यातील पाऊस आणखी वाढला आहे. ही स्थिती पश्चिम-वायव्य दिशेने पुढे जात आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

 

सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. तर, उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने थंडी कमी जाणवणार आहे.

 

 

 

दरम्यान राज्यात ‘ऑक्टोबर हीट’मुळे हैराण झालेल्या नागिरकांना ऑक्टोबरच्या अखेरीस मात्र दिलासा मिळाला. कमाल व किमान तापमानात घट होत थंडीतही वाढ झाल्यामुळे उन्हाचे चटके आणि उकाड्यापासून सुटका झाली. मात्र, असे असले तरी नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

 

 

 

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) वतीने मंगळवारी (ता. ३१) नोव्हेंबर महिन्याचा अंदाज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये कमाल व किमान तापमानासह नोव्हेंबर महिन्यात देशातील पावसाची स्थिती कशी असेल याबाबत अंदाज देण्यात आला आहे.

 

 

 

त्यानुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे.

 

 

 

किमान तापमानाबरोबर राज्यातील कमाल तापमानात सुद्धा सरासरीपेक्षा वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तर देशात मध्य भारत आणि अति उत्तरेकडील भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत कमी नोंदले जाऊ शकते.

 

 

 

नोव्हेंबर महिन्याच्या काळात दक्षिण भारतातील राज्यात अधिक पाऊस पडतो. तर ‘आयएमडी’च्या १९७१ ते २०२० दरम्यानच्या दीर्घकालीन सरासरीनुसार दक्षिण भारतात नोव्हेंबर महिन्यात ११८.७ मिलिमीटर इतका पाऊस पडतो.

 

 

 

 

दरम्यान यंदा नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज पाहता, दक्षिणेकडील बऱ्याच भागांसह, ईशान्य, पूर्व मध्य आणि पश्‍चिमेकडील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे.

 

 

 

 

उर्वरित देशात मात्र पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी असेल. यंदा महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात ही सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला होता.

 

 

 

तर आता नोव्हेंबर महिन्यात देखील अशीच स्थिती राहू शकते. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात नोव्हेंबरमध्ये ही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

 

 

नोव्हेंबर महिन्यात देशात एल-निनो स्थिती कायम राहणार

सध्या समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान आणि वातावरणाच्या स्थितीमुळे एल-निनो स्थिती सामान्य

संपूर्ण देशात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता

 

 

 

 

इंडियन ओशन डायपोलची (आयोडी) स्थितीही सकारात्मक राहण्याची शक्यता

नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरी इतक्या पावसाची शक्यता

 

 

 

दक्षिण, वायव्य, ईशान्य, आणि पूर्व मध्य भारतातील बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

उत्तरेकडील हिमालयात अधिक बर्फवृष्टी/पाऊस अपेक्षित

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *