दोन मतदारसंघात मात्र रंजक ट्विस्ट;एकाच जागेसाठी बापलेक दोघेही इच्छुक

However, there is an interesting twist in the two constituencies; both Bapleks are interested in the same seat

 

 

 

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेक इच्छुक आपणच कसे तगडे उमेदवार आहोत,

 

हे पक्ष नेतृत्वाला दाखवून देण्यात व्यस्त दिसत आहेत. यामध्ये स्वपक्षातच संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं चित्र आहे. अशातच पुण्यातले असे दोन मतदारसंघ असे आहेत जिथे तिकिटासाठी थेट पिता-पुत्र दोघेही इच्छुक असल्याने एक रंजक ट्विस्ट आला आहे.

 

वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसने दावा केला आहे. त्यात वडगावशेरी

 

विधानसभा मतदारसंघात नुकतेच भाजपातून राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले बापूसाहेब पठारे आणि त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे दोघेही निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत.

 

यामध्ये बापूसाहेब पठारे हे वडगाव शेरीचे माजी आमदार आहेत तर सुरेंद्र पठारे यांनी देखील गेल्या काही महिन्यांपासून हा मतदारसंघ पिंजून काढला आहे.

 

त्यामुळे आता शरद पवार सुरेंद्र पठारे यांच्या रूपाने युवा फ्रेश चेहरा अजित दादांच्या सुनील टिंगरे यांच्या विरोधात उतरवतात की पुन्हा एकदा बापूसाहेब पठारे

 

यांना संधी देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आत्ता तरी राष्ट्रवादीतून तिकीट मिळवण्यासाठी पठारे पिता पुत्र हे दोघेही शर्यतीत असल्याने वडगाव शेरीत रंजक ट्विस्ट आला आहे.

 

दुसरीकडे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. कारण काँग्रेसकडून कॅन्टोन्मेंट मतदारसंघात

 

माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे हे दोघे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

 

काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ज्या उमेदवाराचा सलग दोनदा पराभव झाला असेल त्याला तिसऱ्यांदा तिकीट द्यायचं नाही असा निर्णय झाला आहे.

 

त्यामुळे ऐनवेळी रमेश बागवे यांना तिकीट न मिळाल्यास अविनाश बागवे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा बी प्लॅन बागवे कडून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

मात्र आत्ता दोघेही पिता पुत्र निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुण्यातल्या या सगळ्या टफ फाईट मध्ये या दोन मतदारसंघात मात्र रंजक ट्विस्ट आला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *