काँग्रेस आपल्या या आमदाराला उमेदवारी देणार नाही ?घेतली शरद पवारांची भेट,आघाडीत होऊ शकतो तणाव ?
Congress will not nominate its MLA? Sharad Pawar met, there may be tension in the alliance?

क्रॉस वोटींगचा ठपका असल्यामुळे काँग्रेस पक्ष आमदाराला निवडणुकीत उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आमदार सध्या महाविकास आघाडीतील इतर पक्षाच्या संपर्कात आहेत.
त्यांनी शरद पवारांनीही भेट घेतली परंतु पवारांनी अद्याप ग्रीन सिग्नल दिलेले नाही, या आमदाराला शरद पवारांनी उमेदवारी दिल्यास
महाविकास आघाडीत तणाव होण्याची शक्यता आहे, आता शरद पवार काय करतात या कडे काँग्रेस चे लक्ष लागून आहे
विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर चांगलेच चर्चेत आले होते. काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
त्यामुळे आमदार खोसकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत, या मतदारसंघामध्ये इच्छुकांची देखील गर्दी जमली आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला आले असल्याची माहिती आहे.
तर त्यांच्यावरील क्रॉस व्होटिंगचा आरोप चुकीचा असल्याचा शरद पवारांना सांगणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
माझ्यावरील आरोप सर्व चुकीचे आहेत, काँग्रेसकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर मतदारसंघातील कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.
विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नावावर काँग्रेस पक्षाने उमेदवारीसाठी नकार घंटा दर्शवली आहे.
त्यामुळे अस्वस्थ झालेले आमदार खोसकर अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या ते महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत चर्चा करत आहे.
अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि सध्या काँग्रेसचे आमदार असलेले हिरामण खोसकर यांनी याआधी देखील शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली होती.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून हिरामण खोसकर यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात संधी देण्याची मागणी केल्याची माहिती आहे.
आपल्या कार्यकर्त्यांसह हिरामण खोसकर यांनी आधी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. आज पुन्हा एकदा ते शरद पवारांची भेट घेणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात एकूण 15 आमदार आहेत. यात काँग्रेसचा एकमेव आमदार आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
हिरामण खोसकर काँग्रेसचे असले तरी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांशी त्यांचा चांगला संबंध आले. हिरामण खोसकर हे आदिवासी बहुल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.