नीलम गोऱ्हे यांचे सूचक विधान !राजकारणात काही तरी मोठे घडणार
Indicative statement of Neelam Gorhe! Something big will happen in politics

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का? असा प्रश्न शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना विचारला असता
त्यांनी सूचक वक्तव्य केलं. “पत्रकारांनी अलर्ट राहा. कारण तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देताना धावपळ होईल. महाराष्ट्राचे राजकारण खूप वेगाने बदलत आहे.
त्यामुळे आत्ताच त्यावर भाष्य करणे योग्य नाही. आमचे लोक सगळीकडे लढायला तयार आहेत. भाजप आणि शिवसेनेची खूप वर्षांची युती आहे.
त्यामुळे मला वाटत नाही आमच्यात कुठले प्रश्न येणार आहेत”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. प्रश्न विचारण्यात आला की, मग अजित पवार स्वतंत्र लढणार का?, त्यावर नीलम गोऱ्हे यांनी सूचक वक्तव्य केलं.
“मी असं काहीही बोलले नाही. माझ्या तोंडी घालू नका. पण राजकारण बदलत आहे. काही लोक उभे राहत नाहीत. काहींचं अजून काय होतं तर काहीजण मुलाला उभे करायचं ठरवतात.
तो मुलगा वेगळं बोलतो आणि वडील वेगळं बोलतात. आमच्या झिरवळ साहेबांना दहा वर्षांपासून ओळखते. पण मंत्रालयावरून अशी उडी मारतील असे वाटले नाही.
पण पत्रकारांनी अलर्ट रहा कारण तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देताना धावपळ होईल”, असे मोठे संकेत नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
दरम्यान, नीलम गोऱ्हे या आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. “उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारासोबत सामना होतो तिथे शिंदे गट विजयी होतो.
त्यामुळे जिथे ठाकरे गटाचे उमेदवार दिले जातील तिथे शिंदे गटाला जागा मिळाव्यात”, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली.
“लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक गैरसमज पसरवले जात आहे. महिलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून सरकारने टाकलेले पाऊल आहे. सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवत महिलांच्या पाठीशी उभे राहिले.
महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतो. कुटुंबातील लोकांकडूनही त्रास दिला जातो आणि बाहेरच्या लोकांकडून अन्याय केला जातो. मात्र 16 टक्के कन्विकशन रेट आहे. हा कमी आहे”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
“काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या लक्षात आल्यावर कळले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्व कळले. कदाचित प्रणिती शिंदे यांना देखील वयोमानानुसार एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेचे महत्व कळेल.
एकीकडे सेक्युलरिझम बोलायचे आणि दुसरीकडे भगवा दहशतवाद बोलायचे अशी काँग्रेसची दुहेरी निती आहे”, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.