ज्ञानराधा मल्टीस्टेट;कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या, दोन गुन्हे दाखल

Gnanaradha Multistate; Deposits worth crores of rupees stuck, two cases filed

 

 

 

 

 

 

 

 

आज ज्ञानराधावर माजलगावमध्ये दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहे. यामध्ये एका गुन्ह्यात 3 लाख 80 रुपयांची फसवणूक तर दुसऱ्या गुन्ह्यात 1 लाख 10 हजार रुपयांची

 

 

 

फसवणूक झाल्याप्रकरणी सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिरूमला उद्योग समूह याच मल्टीस्टेट बँकेत पैसे अडकल्यामुळे अडचणीत सापडला आहे.

 

 

 

 

गेल्या सात महिन्यांपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत आणि हजारो ठेवीदार गेल्या सात महिन्यांपासून ठेवी परत मिळतील या आशेवर आहेत.

 

 

 

 

आज माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सुरेश कुटे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेवीदारांनी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद केले आहेत.

 

 

 

 

यामध्ये तीन लाख 80 हजार रुपये हा पहिला गुन्हा तर दुसऱ्या गुन्ह्यात एक लाख 10 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी

 

 

 

दुसरा गुन्हा माजलगाव पोलीसात नोंद झाला आहे. हे दोन्ही गुन्हे नोंद झाल्यामुळे सुरेश कुटे यांच्या अडचणी वाढल्याचे दिसतं.

 

 

 

बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी धाडी टाकल्या होत्या. तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या होत्या.

 

 

 

 

बीड, पुणे, सोलापूर, फलटण, औंगाबादमधील तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने कारवाई करत अनेक कागदपत्रे जप्त केली होती.

 

 

 

 

महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

 

 

 

खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल , वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *