काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने केली स्वखर्चातून मोफत गॅस सिलेंडर रिफिलची घोषणा
An aspiring Congress candidate announced free gas cylinder refills at his own expense
अवघ्या महिनाभराच्या अंतरावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी जास्तीत जास्त मतदारांचा कौल मिळवण्याचा सर्वच पक्षांनी निर्धार केला आहे.
महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्या योजनेला मोठा प्रतिसाद गेल्या काही महिन्यांत मिळाला असून,
ती योजना जास्तीत जास्त कॅश करण्याचा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. तर मविआनेही विधआनसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे.
आता कल्याणमध्ये पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी दहा हजार गरजू महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडर रिफिलची घोषणा केली आहे.
पातकर यांनी ही योजना स्वखर्चातून राबवण्याचा निर्णय घेतला असून, आगामी दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
विधानसभा निवडणूकीला काही दिवस राहिले आहेत. याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये या जागांसाठी रस्तीखेच सुरु आहे. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कल्याण पश्चिम
आणि पूर्व ही जागा मिळण्यासाठी रणनिती आखली जात आहे. कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.
या परिषदेत पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी स्वखर्चातून 10 हजार गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर रिफिल करुन देणार अशी घोषणा त्यांनी केली आहे.
विधानसभेच्या निवडणूकीसाठी राजाभाऊ काँग्रेसकडून इच्छूक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीकरीता जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी गॅस सिलेंडरचे मोफत रिफिल देण्यात येत आहेत का
अशा चर्चा रंगत आहे विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सर्व पक्षीय उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. मात्र कोणती जागा कोणत्या पक्षाने लढवावी याबाबत महायुती
आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत हे सर्वात मोठं आव्हान आहे. कल्याण डोंबिवलीत एकूण चार विधानसभा आहेत.
या चारही विधानसभांपैकी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभेवर काँग्रेस दावा ठोकणार असल्याची चर्चा आहे.