अजित दादांचा शरद पवारांवर राजकीय बॉंबगोळा ;मी हे साहेबांच्या परवानगीनेच केले
Ajit Dada's political bombshell on Sharad Pawar; I did this with your permission
आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती, जो निर्णय घेतला तो पवार साहेबांना विचारुन आणि संमतीनेच, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
बारामतीतल्या डॉक्टर मेळाव्यात ते बोलत होते. तसंच सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी आधी मान्य केली होती आणि आताही मान्य करतो, असा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला.
अजित पवार म्हणाले, मला राजकीय भूमिका घ्यावी लागली ती साहेबांना विचारून घेतली. ते सुरुवातीला हो म्हणाले परत म्हणाले की ही, भूमिका मला घेता येणार नाही.
अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पुढे गेलो. पण हे सगळे होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. मात्र आता काय झाले दोन पक्ष झाले आहेत.
सध्या दोन्ही बाजूंची पवार मंडळी सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायले लागले… कधी न दिसणारे परंतु आता साड्या द्यायला लागले, स्टीलची घमेले द्यायला लागले,
स्टीलचे डबे द्यायला लागले.. ते म्हणतात ना पुरुष मंडळी आहेत तोपर्यंत घर एक असते, पण एकदा का काही… सध्या नवरात्र आहे. स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे, असे अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
आगामी निवडणुकीच्या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले . मी मधल्या काळात पक्क ठरवलं होतं की बास झाले आता… पण कधी ना कधी थांबावं लागते,
पण लोकांच्या रेट्यापुढं काही गोष्टी कराव्या लागतात. आजपर्यंतचा तुम्हाला अनुभव त्यासंदर्भात मी पुन्हा विचार करायला लागलो आहे.
1967 पासून आजपर्यंत काही मिळाले नाही आता मिळतंय ते घ्या म्हणावं. इतक्या वर्ष मत देत आलेलो आहे त्यामुळे मिळतय ते घ्या, असे तुमचे पेशंटला सांगा असे देखील अजित पवार म्हणाले.
शाल देताना आयोजकांनी काटकसर केली, काटकसर करणं चागलं, पण आम्ही पेशंट म्हणून आल्यावर पण गोळ्या देतांना काटकसर करा, अशी कोपरखळी डॉक्टरांना अजित पवारांनी मारली.
गेल्या वेळची परिस्थिती वेगळी होती. साहेबांच्या वयाचा विचार करत लोकसभेला सुप्रिया सुळे मतदान करायचे मानसिकता बारामतीकरांची होती.
शेवटी मतदाराला अधिकार आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी मान्य केली. आता मागचे सर्व विसरुन पुढे जायचे, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. राज्याच्या राजकारणात पवारांचे मातब्बर घराणे म्हणून ओळखले जाते.
राजकारणात घराण्याच्या तीन ते चार पिढ्या उतरल्या. पण घर अभेद्य होते. मात्र हे घर अजित पवारांच्या बंडामुळे फुटले. इतर राजकीय घराण्यांप्रमाणे घरफुटीचे दुःख पवार घराण्याच्याही वाट्याला आले आहे.
तशा थोड्या फार कुरबुरी सगळ्या घरांमध्ये असतात. त्यात राजकारण म्हटल्यावर तर महत्त्वाकांक्षाही जास्तच असणारच.. त्याच महत्त्वकांक्षेपोटी काका-पुतण्या वैराचा वेढा पवार कुटुंबांला पडला
आणि रक्ताची नाती तुटली आहेत. पहिल्यांदाच अजित पवारांनी कुटुंबात पडलेल्या फुटीला कोण जबाबदार आहे यावर भाष्य केले आहे.
अजित पवार म्हणाले, सध्या राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले आहेत. आतापर्यंत तुम्हाला कधी त्रास झाला नाही कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. मात्र आता काय झाले दोन पक्ष झाले आहेत.
सध्या दोन्ही बाजूंची पवार मंडळी सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायले लागले… कधी न दिसणारे आता घरी येऊन साड्या द्यायला लागले,
स्टीलची घमेले द्यायला लागले, स्टीलचे डबे द्यायला लागले.. एकीने केले की दुसरी लगेच हट्टाला पेटती लगेच ती करते.. ते म्हणतात ना पुरुष मंडळी आहेत तोपर्यंत घर एक असते, पण एकदा का काही… सध्या नवरात्र आहे. स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे.
अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत.
आगामी विधानसभा निडणुकीत पुन्हा एकदा बारामतीत पवार वि. पवार अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे मैदानात उतरण्याती शक्यता आहे.
युगेंद्र हे अजित पवार यांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. युगेंद्र सध्या बारामतीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. जनता दरबार घेत आहेत. सोशल मीडियावर देखील प्रचंड अॅक्टिव्ह आहेत.
शरद पवारांचं बोट धरून अजित पवार राजकारणात आले, मात्र आता अजित पवारांनी काकांची साथ सोडली. ज्या शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात तयार केलं,
या अजित पवारांनी काकांची साथ सोडली.हे पवार कुटुंबातील अनेकांना रुचले नाही. या संदर्भात श्रीनिवास पवारांनी भूमीका देखील स्पष्ट केली. पुरुष असताना घर एक असतं,
पण… त्यानंतर अजित पवारांनी आपले वाक्य अपूर्ण ठेवेले. अजित पवार हे कायम त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात.
मात्र यावेळी भाषणात अजित पवारांनी ओठांपर्यंत आलेले शब्द गिळले, अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित होतो.