हरियाणात भाजपचा बम्पर विजया झाला मात्र महाराष्ट्रात शिंदे -अजित दादांचे टेन्शन वाढले

BJP got a bumper victory in Haryana, but the tension between Sheen and Ajit Dada increased in Maharashtra

 

 

 

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. मतमोजणीत हरियाणामध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे.

 

तर जम्मू-काश्मीरात काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीनं मुसंडी मारली आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपची कामगिरी चांगली आहे.

 

हरयाणा, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या जागा वाढत आहेत. पण भाजपसोबत युतीत राहिलेल्या, भाजपनं युती तोडलेल्या पक्षांची वाताहत झाली आहे.

 

हरयाणात जननायक जनता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाला जबर फटका बसला आहे. या पक्षांच्या प्रमुखांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

 

ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. आता या दोन्ही पक्षांना मतदारांनी जबरदस्त दणका दिला आहे. त्यामुळे भाजप प्रादेशिक पक्षांसोबत युती करुन त्यांना संपवत असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

२०१९ मध्ये हरयाणात विधानसभा निवडणूक झाली. त्यात भाजपनं ४० जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा ४६ असल्यानं दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीचा भाव वधारला.

 

पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या जेजेपीचे १० उमेदवार विजयी झाले होते. चौटाला यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. नव्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. पण लोकसभा निवडणुकीवेळी त्यांची भाजपसोबतची युती तुटली.

पहिल्याच फटक्यात १० जागा जिंकणाऱ्या जेजेपीची अवस्था आज प्रचंड वाईट आहे. स्वबळावर लढण्याचा निर्णय जेजेपीचे अध्यक्ष चौटाला यांनी घेतला.

 

तो निर्णय चुकीचा ठरला आहे. सध्याच्या घडीला जेजेपीला एकाही जागेवर आघाडी नाही. भाजपचा आधार हरयाणात बिगर जाट समाज राहिला आहे.

 

तर चौटाला यांच्या जेजेपीचं राजकारण जाट मतांवर अवलंबून आहे. शेतकरी आंदोलन सुरु असताना जेजेपी भाजपसोबत सत्तेत होती. चौटाला यांचा तो निर्णय चुकला. आता त्यांचा पक्ष १० वरुन थेट शून्यावर येताना दिसत आहे.

 

दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीला धक्का बसताना दिसत आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीनं ९० पैकी ४७ जागांवर आघाडी घेतली आहे.

 

तर भाजपचे उमेदवार २९ जागांवर पुढे आहेत. भाजपचा मित्र पक्ष राहिलेल्या पीडीपीला केवळ ४ जागांवर आघाडी आहे. मुफ्ती यांची लेक इल्तिजानं आपण पराभव मान्य करत असल्याचं म्हटलेलं आहे.

 

 

मागील निवडणुकीत म्हणजेच २०१४ मध्ये भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये २५ जागा जिंकल्या होत्या. आता त्यांच्या जागा वाढताना दिसत आहेत.

 

पण भाजपसोबत निवडणुकीनंतर युती करणारी पीडीपी २८ वरुन थेट ४ वर घसरताना दिसत आहे. भाजप, पीडीपीनं राजकीय सोय म्हणून विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन केलं.

 

भाजपसोबतच्या युतीचा फटका पीडीपीला बसला. भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री झालेल्या मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष आता प्रचंड अडचणीत आला आहे.

 

भाजप प्रादेशिक पक्षांसोबत युती करतो. मग त्यांच्या मदतीनं राज्यात पाळमुळं रुजवतो. मग हळूहळू आपल्याच मित्रांना कमकुवत करतो,

 

असं म्हटलं जातं. यासाठी शिरोमणी अकाली दल, शिवसेना यांची उदाहरणं दिली जातात. आता त्यात पीडीपी, जेपीपी यांची भर पडली आहे.

 

पीडीपीच्या मुफ्ती, जेपीपीचे चौटाला भाजपसोबत जाऊन अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्रात असाच काहीसा प्रकार एकनाथ शिंदे,

 

अजित पवारांसोबत घडला आहे. त्यांना सोबत घेऊन भाजपनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केलं आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचं भविष्य काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *