बाबा सिद्दीकींना वाय दर्जाची सुरक्षा ;पण हल्लेखोरांनी घर ,कार्यालयाची दीड महिना रेकी,आणि केली हत्या
Baba Siddiqui was given Y grade security, but the attackers raided his house and office for one and a half months and killed him.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री (दि. १२ ऑक्टोबर) गोळीबार झाला. छातीत आणि पोटात गोळ्या लागल्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे निधन झाले.
त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली गेली.
शनिवारी रात्री ते वांद्रे पूर्वचे आमदार आणि मुलगा झिशान सिद्दीकीच्या कार्यालयात जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला.
६६ वर्षीय बाबा सिद्दीकी हे बांधकाम व्यावसायिक होते. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन मारेकऱ्यांना अटक केली. हे दोघे बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
तत्पूर्वी पोलिसांनी विविध अंगानी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या गोळीबारामागे वैयक्तिक शत्रूत्व किंवा राजकीय कारण होते का? याचाही तपास केला जात आहे.
तसेच बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यात जवळचे संबंध होते, त्यामुळे बिश्नोई गँगचा या गोळीबारात सहभाग होता का? हाही तपास केला जात आहे.
कर्नेल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी रात्री मारेकऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे सांगितले.
कर्नेल सिंह हा हरियाणाचा असून धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मागच्या २५-३० दिवसांपासून सिद्दीकी यांच्या मागावर होते.
बाबा सिद्दीकींना लिलावती रुग्णालयात आणल्यानंतर काय घडले याची माहिती डॉ. जलील पारकर यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले, “रात्री ९.३० च्या सुमारास बाबा सिद्दीकींना रुग्णालयात आणले गेले.
आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले. त्यांची पल्स मिळत नव्हती. ब्लड प्रेशरही मिळत नव्हते. आम्ही त्यांचा ईसीजी काढला तेव्हा तो फ्लॅट लाईन आला. आम्ही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले होते.
डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. रक्तस्त्राव थांबावा आणि ब्लड प्रेशर वर जावे यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले.
त्यांना तशी औषधंही देण्यात आली. पण ११.२५ च्या दरम्यान आम्ही त्यांना मृत घोषित केले” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.
बाबा सिद्दीकी हे १९९९, २००४ आणि २००९ मध्ये असे सलग तीन वेळा काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना २००४ ते २००८ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली गेली.
मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते विधानसभेत हिरिरीने मांडत असत. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता.
२०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नाही, परंतु आपल्या मुलाला झिशान सिद्दीकी याला वांद्रे पूर्वमधून निवडून आणले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता.
बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात असत. त्या पार्ट्यांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त यांच्यासारखे बॉलिवूड स्टार्स जात असत.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे पूर्व येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली.
हरियाणातील गुरमेल सिंग आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून दोघेही २० वर्षांचे आहेत.
त्यांना दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हे आरोपीत्यांच्यावर पाळत ठेवून होते,
असं पोलिसांनी सांगितल्यांच टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्त म्हटलं आहे. तसंच, हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीचाही पोलीस शोध घेत आहेत.
बाबा सिद्दिकी त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागली.
या हल्ल्यात एक गोळी त्यांच्या सहकाऱ्यालाही पायाला लागली. यानंतर या दोघांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.
मात्र, बाबा सिद्दिकींचा मृत्यू झाल्याचं आता लीलावती रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असं आता सांगितलं जात आहे.
बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दीकींच्या एका सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे. आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.
दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) नेते रुग्णालयात दाखल झाले. अभिनेता संजय दत्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील रुग्णालयात दाखल झाले.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे.
यासंदर्भातला पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत असल्याची माहितीही पोलिसांकडून सांगण्यात आली आहे. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकींना लिलावती रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा काय घडलं याची सविस्तर माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.
“साधारण ९.३० च्या सुमारास बाबा सिद्दीकींना रुग्णालयात आणलं गेलं. आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं. त्यांची पल्स मिळत नव्हती. ब्लड प्रेशरही मिळत नव्हतं.
आम्ही त्यांचा ईसीजी काढला तेव्हा तो फ्लॅट लाईन आला. आम्ही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. रक्तस्त्राव थांबावा आणि ब्लड प्रेशर वर जावं यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले.
त्यांना तशी औषधंही देण्यात आली. पण ११.२५ च्या दरम्यान आम्ही त्यांना मृत घोषित केलं. बाबा सिद्दीकींना दोन गोळ्या छातीवर लागल्या होत्या आणि त्या आरपार गेल्या होत्या.
अत्यंत जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले पण ते वाचू शकले नाहीत.” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.
बाबा सिद्दीकींवर झालेल्या हल्ल्यानंतर आणि त्यांच्या मृत्यूनंतर आता विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी
आता पायउतार झालं पाहिजे अशी मागणी केली आहे. तसंच इतर विरोधकांकडूनही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.