माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची प्रकृती गंभीर

Samir Khan, son-in-law of former minister Nawab Malik, is in critical condition

 

 

 

महाराष्ट्राचे माजी मंत्री, परभणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा भीषण अपघात झाला होता. त्याबाबात आता मोठी माहिती समोर आली आहे. समीर खान यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे.

 

काही दिवसांपूर्वी समीर खान यांचा भीषण अपघात झाला होता. मुंबईतील क्रिटी केअर या रुग्णालयासमोर त्यांच्याच ड्रायव्हरने त्यांच्यावर गाडी घातली होती.

 

या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या शऱीरावर अनेक जखमा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

 

नवाब मलिक यांचे जावई हे एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता.

 

 

नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि तिचे पती समीर खान क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले होते. तपासणी झाल्यानंतर घरी परतण्यासाठी ते हॉस्पिटलच्या बाहेर कारची वाट बघत उभे होते.

 

तेवढ्यात त्यांचा ड्रायव्हर अबुल मोहम्मद सोफ अन्सारी गाडी घेऊन आला. पण, त्याने चुकीने गाडीच्या एक्सलेटरवर पाय ठेवला आणि थार थेट समीर खान यांच्या अंगावर गेली.

 

या अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला तसेच शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या.

 

रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या मेंदूत गाठ झालेली आणि बरगडी, खांदा आणि मानेला अनेक फ्रॅक्चर झाले होते.

 

कुर्ला येथील क्रिटी केअर हॉस्पिटलच्या डॉ. दीपका नामजोशी यांनी सांगितले होते की, समीर खान यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

या भीषण अपघातात फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन मोटारसायकलींचेही नुकसान झाले होते. तर, या प्रकरणात थार एसयूव्हीचा चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *