पाहा महाविकास आघाडीत कोणत्या जागांवर फसला पेच

Look at the seats in the Mahavikas Aghadi where there is confusion

 

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप सुरु असताना महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. विदर्भातील जागांवरुन महाविकास आघाडीत तणातणी झाली असून उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

 

सर्वच्या सर्व म्हणजेच २८८ जागांवर लढण्याबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांनी बैठक बोलावल्याचं समजतं. त्यामुळे ठाकरे आरपारच्या भूमिकेत आहेत की त्यांच्याकडून दबावतंत्राचं राजकारण सुरु आहे, याची चर्चा रंगली आहे.

 

विदर्भातील ६२ पैकी १२ जागांसाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. तर काँग्रेस ठाकरेसेनेला ८ जागा सोडण्यात तयार आहे. विदर्भात लोकसभेला काँग्रेसची कामगिरी सर्वात चांगली राहिली.

 

त्यामुळे पक्ष विदर्भात अधिकाधिक जागा लढण्यास उत्सुक आहे. तर ठाकरेसेनेकडून काँग्रेसला लोकसभेला करण्यात आलेल्या त्यागाची आठवण करुन दिली जात आहे.

 

अमरावती, रामटेकसारख्या विदर्भातील जागा आम्ही काँग्रेसला सोडलेल्या होत्या, याचं स्मरण ठाकरेसेनेकडून करुन देण्यात येत आहे.

 

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. तर ठाकरे आणि पवार गटाला प्रत्येकी ८ जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पण ठाकरेसेनेला १२ जागा हव्या आहेत.

 

या जागांवर काँग्रेसचे आमदार नाहीत. त्यामुळे या जागा आम्हाला सोडण्यात याव्या, अशी ठाकरेंची मागणी आहे. रामटेक, कामठी, द नागपूर, वरोरा,

 

भंडारा, बुलडाणा, सिंदखेडराजा, आर्णी, यवतमाळ, दिग्रज, आरमोरी, वर्धा या १२ जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे. यातील रामटेक, कामठी, द नागपूर, भंडाऱ्याची जागा ठाकरेंना सोडण्यास काँग्रेस तयार नाही. त्यामुळे तिढा वाढला आहे.

 

रामटेक, भंडाऱ्यात २०१९ मध्ये शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे या जागांसाठी ठाकरेसेना आग्रही आहे.

 

पण दोन्ही आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानं या जागा ठाकरेसेनेला सोडण्यास काँग्रेस तयार नाही. त्यामुळेच विदर्भातील ४ जागांवरुन महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे.

 

तो सोडवण्यासाठी शरद पवारांनी मध्यस्थी सुरु केली आहे. त्यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना फोन केले आहेत.

 

काँग्रेसचे विधानसभा निवडणूक प्रभारी चेन्निथला यांनी कालच उद्धव ठाकरेंची भेट घेत महाविकास आघाडीची तब्येत उत्तम असल्याचं म्हटलं होतं.

 

पण आज ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत काही अंतर्गत आजार असल्याचं म्हटलं होतं. काही आतले आजार वरुन दिसत नाहीत. त्यासाठी एक्सरे, एमआरआय काढावे लागतात, असं विधान राऊत यांनी केलं आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *