महायुतीत घमासान अजित पवारांचा १६ जागांवर तर शिंदेंचा २२ जागांवर दावा
Ajit Pawar claims 16 seats while Shinde claims 22 seats in the grand alliance
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं १० जागांपेक्षा एकही कमी जागा लढवणार नसल्याची भूमिका घेतली होती.
आता राष्ट्रवादीकडून सहा जागांसाठी आग्रह धरण्यात आला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं २२ जागा लढवणार
असल्याचं म्हटलंय. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार अशी चर्चा आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं यापूर्वी १० जागा लढवण्याची भूमिका घेतली होती.त्यात आता आणखी ६ जागांची भर पडली आहे.
यामध्ये सध्या एकनाथ शिंदेंकडे असलेली कोल्हापूर, नाशिक या जागांचा समावेश आहे. तर भाजपकडे असलेल्या अहमदनगर दक्षिण, भंडारा गोंदिया, नाशिक, दिंडोरी
आणि उत्तर पूर्व या जागांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज आणि उद्या घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत एकूण १६ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपकडे असलेला अहमदनगर दक्षिणचा मतदारसंघ हवा आहे. तिथ सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे खासदार आहेत.
अजित पवार समर्थक आमदार निलेश लंके या मतदारसंघातून इच्छुक आहेत. उमेदवारी न मिळाल्यास ते पुन्हा शरद पवारांसोबत जातील, अशा चर्चा आहेत.
भंडारा गोंदिया हा प्रफुल पटेलांचा गड मानला जातो, त्यामुळं ती जागा देखील राष्ट्रवादीला हवी आहे. दुसरीकडे दिंडोरीतून विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जागी राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ यांना संधी देण्याबाबत चर्चा होऊ शकते.
नाशिक मतदारसंघात सध्या सेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत, पण, छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी पक्ष आग्रही असेल.
ईशान्य मुंबईच्या जागेवर राष्ट्रवादीनं २०१९ ला विजय मिळवला होता. त्या जागेवर देखील राष्ट्रवादीकडून आढावा घेतला जाणार आहे.
कोल्हापूरमध्ये सध्या शिवसेनेचे संजय मंडलिक खासदार आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान ही जागा राष्ट्रवादीकडे होती.