मुख्यमंत्री एकनाथ शिंदें भावुक म्हणाले ….. माझे डोळे उघडले
Chief Minister Eknath Shinde said emotionally ..... My eyes opened

मी एक बाप म्हणून, नवरा म्हणून कमी पडलो.. श्रीकांतच्या भाषणाने माझे डोळे उघडले, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.
ते शनिवारी कोल्हापूर येथे शिवसेनेच्या महाअधिवेशनात बोलत होते. कोल्हापूर येथील कार्यक्रमात शुक्रवारी खासदार श्रीकांत शिंदे हे भावुक झाल्याचं बघायला मिळालं होतं.
श्रीकांत शिंदे म्हणाले होते की, जनतेच्या कामात माझे वडील इतके व्यस्त असतात की आम्हाला कधीच ते वेळ देऊ शकले नाहीत. हे बोलताना श्रीकांत शिंदे भावुक झाले होते.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सकाळी एक पोस्ट करत भावनांना वाट मोकळी करुन दिली. दुपारच्या दरम्यान जाहीर भाषणामधून पुन्हा त्यांनी त्याच मुद्द्यावर भाष्य केलं.
जाहीर भाषणात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी एक बाप म्हणून, नवरा म्हणून कमी पडलो.. श्रीकांतच्या भाषणातून डोळे उघडले. त्याला कुणी विचारलं,
आई-वडिलांसोबतच्या आठवणी सांग, तर माझ्यासोबतच्या त्याच्या आठवणी कमी आहेत. कारण मी घरी जायचो तेव्हा सर्व झोपलेले असायचे. आमची पंधरा-पंधरा दिवस भेट व्हायची नाही.
शिंदे पुढे म्हणाले, कालच्या भाषणात तो (श्रीकांत) वस्तुस्थिती बोलून गेला.. तुम्हाला तो परिवार समजतो म्हणून बोलून गेला.. माझ्या बापाचा मला अभिमान आहे, असंही तो बोलला. मलाही त्याचा अभिमान आहे.
मात्र आता संपूर्ण शिवसेना आपला परिवार आहे. संपूर्ण राज्य आपला परिवार आहे. केवळ माझं कुटुब माझी जबाबदारी नाही. माझ्या कामाचं रहस्य ही लोकांची गर्दी आहे, असं शेवटी एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं. पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती.
नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला, असं मुख्यमंत्री म्हणाले.