माजी गृहमंत्र्यावर पैसे घेतल्याचा गंभीर आरोप

Serious allegation of taking money on former home minister

 

 

 

अनिल देशमुख खंडणी वसुली प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

 

अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेंनी केला होता. एवढच नाही तर वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना

 

पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य वाझेंनी दिली आहे.  देवेंद्र फडवणवीसांवर अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी अतिशय गंभीर आरोप केले होते.

 

सचिन वाझे म्हणाले, सगळे पुरावे आहे. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे.

 

मी सगळे पुरावे दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव लिहले आहे.

 

सचिन वाझे हे सध्या तुरुंगात आहे. त्यांच्यावर सध्या मनसूख हिरेन हत्याकांड आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवल्याचा आरोप आहे.

 

या प्रकरणात सध्या ते तुरुंगात आहे. सत्तांतर झाले त्यानंतर अनिल देशमुखांवर वसुलीचे आरोप करण्यात आले. परमबीर सिंग यांनी देखील गंभीर आरोप केले होते.

 

आता त्याची पुष्टी सचिन वाझेंनी केली आहे. सचिन वाझे हे त्यावेळी वारंवार बंगल्यावर जात होते. त्यावेळी ते पीएच्या संपर्कात होते.

 

आता सचिन वाझेंनी समोर येऊन देशमुख पीएच्या माध्यामातून पैसे घ्यायचे हे स्पष्ट केले आहे.

 

आरोपच नाही केले तर देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी या संदर्भातील पत्र लिहित पुरावे दिले आहे. त्यामुळे आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या

 

अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.

 

तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात मागील वर्षी एप्रिल महिन्यात सचिन वाझे,

 

अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *