शिंदें गट -अजित पवार गटात तणाव ; दादांचा आमदार ठरले कारण
Tension between Shinde group - Ajit Pawar group; Because Dada became MLA
इकडे लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि विरोधक, सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी वाढल्या. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच बारामती मतदारसंघ चर्चेत होता,
तो नणंद-भावजय अशा लढतीच्या चर्चांमुळे. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात बारामतीची लढत रंगणार अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला
आणि अवघ्या राज्याच्या नजरा बारामतीवर खिळल्या. मात्र, आता बारामतीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या लढतीच्या चर्चा
तशा काहीशा विरळ झाल्या आहेत. सध्या बारामतीत चर्चा आहे ती, विजय शिवतारेंनी अजित पवारांना दिलेल्या आव्हानाची.
विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात जणू एल्गारच पुकारलाय. शिंदे गटात असलेले माजी आमदार विजय शिवतारे बारामतीची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांची जवळपास जाहीरच केलं आहे. मात्र, आता शिवतारेंच्या बंडाचे परिणाम राज्यभर उमटणार आहेत.
शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांचा गट करणार नाही, अशी भूमिका आमदार अण्णा बनसोडेंनी घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीत बारामतीवरुन पेच तर निर्माण होणार नाही ना? अशा चर्चा सुरू आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर, आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी समजावलं आहे. मात्र तरीही त्यांनी बंडखोरी केली तर त्याचे परिणाम राज्यभर उमटतील.
शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांची राष्ट्रवादी करणार नाही, अशी भूमिका पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.
बारामती लोकसभेत शिंदे गटाचे विजय शिवतारे बंडखोरीवर ठाम आहेत. मात्र आता याचे पडसाद राज्यभर उमटणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज देऊन शिवतारे ऐकत नसतील तर
आम्ही जिथं शिंदे गटाचे उमेदवार असतील तिथं प्रचार करणार नाही, अशी टोकाची भूमिका अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंनी घेतली.
मावळ लोकसभेत खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार न करून, अजित पवारांचा गट पार्थच्या पवारांचा बदलाही घेऊ इच्छितो अशीच चर्चा आहे.
या बाबत आमदार बनसोडे यांनी थेट उत्तर देणं टाळलं. प्रचार करणार नाही याचा अर्थ विरोधकांचा प्रचार करुन असं नाही, आम्ही तटस्थ भूमिका घेऊ असं अण्णा बनसोडे म्हणाले आहेत.