मराठवाड्यातील भाजप नेत्याच्या प्रचारसभेत शेतकरी आक्रमक ;व्हिडीओ होतोय व्हॉयरल

Farmers are aggressive in BJP leader's campaign meeting in Marathwada; video is going viral

 

 

 

महाराष्ट्रात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारसभांमध्ये राजकीय नेत्यांना विविध कारणांमुळं रोषाला सामारं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या सभेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केला आहे.

 

या व्हिडीओचा दाखला देत जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर सोयाबीन आणि कापसाच्या दरावरुन प्रश्न विचारले आहेत. कापूस आणि इतर पिकांनाही हमीभाव नाही.

 

त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गच संतप्त आहे, असं पाटील म्हणाले. पेटलेला बळीराजा मतदानाच्या दिवशी महायुती सरकारला चांगलाच धडा शिकवणार, असंही त्यांनी म्हटलं.

मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे तसा या सरकारविषयी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह अन्य शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे.

 

हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. भाजपच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत सामान्य शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या हमीभावाबाबत पाशा पटेल यांना जाब विचारला.

 

हे तेच पाशा पटेल आहेत ज्यांनी २०१३ साली शेतकरी दिंडी काढली होती आणि त्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला ६००० भाव द्या अशी मागणी केली होती.

 

फडणवीस जी साडेसात वर्षे सत्तेत आहेत, पाशा पटेल हे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असून त्यांना मंत्री पदाचा दर्जा महायुती सरकारने दिला आहे. पण आज सोयीबीनला भाव किती मिळत आहे?

 

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव गावात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

या सभेत शेतकऱ्यांनी पाशा पटेल यांना सोयाबीनच्या भावासंदर्भात प्रश्न विचारले. भाजपकडून याठिकाणी तानाजी मुटकुळे रिंगणात आहेत. तर, महाविकास आघाडी कडून रुपाली पाटील गोरेगावकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

दरम्यान, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्यानं संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. याशिवाय राज्य सरकारनं शेतकऱ्यांमधील रोष कमी करण्यासाठी भावांतर योजना आणली होती.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *