बच्चू कडू सरकारमधून बाहेर पडणार ?आज शरद पवारांना भेटणार
Will Bachu get out of the bitter government? Will meet Sharad Pawar today

आमदार बच्चू कडू यांची सध्याची राजकीय भूमिका सहजासहजी लक्षात येत नाही. ते महायुतीसोबत असले, तर त्यांच्या वक्तव्यावरुन संभ्रम निर्माण होतो.
ते नेमके महायुतीसोबत आहेत की, महाविकास आघाडी सोबत आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. बच्चू कडू यांची आज शरद पवार यांच्याबरोबर भेट होणार आहे.
त्यांनी अमरावती दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार, शरद पवार आज बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत.
बच्चू कडू अचलपूरचे आमदार आहेत. त्यांनी चांदूरबाजारमध्ये शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. बच्चू कडू महाविकास आघाडीत प्रवेश करणार का? ही चर्चा जोरात सुरु आहे.
दरम्यान “मदतीची जाणीव म्हणून त्यांना आम्ही भेटीला बोलावल. अचलपूरमधील फिनले मिल मध्ये त्यांचं मोठं योगदान आहे” असं बच्चू कडू म्हणाले. “आमचा राजकीय पक्ष आहे.
आम्ही काही समाजसेवी संस्था नाही. आमची जर राजकीय मजबूती वाटत असेल तर कुठला पक्ष नाकारणार आहे?” असं बच्चू कडू म्हणाले.
“जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत आम्ही सोबत आहोत, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ” असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
“आमच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती सारखीच आहे. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत मुद्यासोबत गेलो. दिव्यांग मंत्रालय दिले म्हणून आम्ही एकनाथ शिंदे सोबत आहे.
आमचे मुद्दे जर घेतले तर आम्ही महाविकास आघाडी सोबत जाऊ” असं बच्चू कडू म्हणाले. “आमचा प्रस्ताव महाविकास आघाडी
आणि महायुतीला देखील देऊ. ज्यांनी आमची हे मुद्दे प्रामुख्याने घेतले आम्ही त्यांच्यासोबत जाऊ” असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.