राज आणि उद्धव युती झाली आता महाविकास आघाडी…

Raj and Uddhav have formed an alliance, now it is a Mahavikas Aghadi…

bj admission
bj admission

 

 

 

मुंबईतील वरळी डोममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते मराठीच्या मुद्यावर एकत्र आले. गेल्या 18 वर्षानंतर दोन्ही नेते एकाच मंचावर दिसले. दोघांनी त्यांच्या भाषणातून एकीचा हुंकार भरला.

शेतकऱ्यांनो तुमच्या सोलर पंपाचे वारा ,पाऊस किंवा इतर कारणाने नुकसान झाल्यास तक्रार करा

 

यापुढे दोघेही एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत दोघांनी दिले. या दोघांची युती झाली तर त्याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, याची गोळाबेरीज सुरू झाली आहे.

 

 

राज्यातही त्यावर चर्चा होत आहे. त्यातच शिंदे सेनेच्या या शिलेदाराने मोठे भाकीत केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीविषयी मोठे विधान केले आहे.

एसटी बस चे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट

 

मंत्री संजय शिरसाट यांनी या मेळाव्यावर भाष्य केले आहे. आजचा जो मेळावा झाला, चांगला झाला. महाराष्ट्राने पहिला, दोन्ही भाऊ एकत्र आले. पण सर्वांची नजर राज ठाकरेंच्या भाषणावर होती, राज ठाकरे यांनी संयमी भाषण केले, मुद्देसुद भाषण केले, असे ते म्हणाले.

 

 

मराठी का हवी हिंदी का नको, हे त्यांनी मांडले. अनेकजण राजकीय अंदाज लावत होते, एकत्र आल्यावर काय होणार, पण काहीही नाही. सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकजण होती,

 

रेशनचं धान्य वाटप आता डिजिटल पद्धतीने

 

त्यांनी देखील अट घातली असेल, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे भाषण तेच टोमणे होते. सर्वकाही आलबेल आहे, असं काही घडलं नाही. दोघांनी हात उंच केले नाही. मेळावा फक्त मराठी भाषेसाठी होता, असे वक्तव्य शिरसाट यांनी केले.

 

न्यायाधीशासमोरच वकील प्यायला दारू ,न्याधीशांनी थेट….

 

तुम्ही जय गुजरात म्हणाले नाही का, तुम्ही लुंगी डान्स केला नाही का? तुम्ही केले तेच बरोबर असे का म्हणता? शिंदे काही चुकीचे बोलले नाही, ते एका समाजाचे लोक होते, गुजरात लोक पाकिस्तानमधून आले नाही,

 

 

असे शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या लोकांचा मेळावा घेतला नाही का? त्यावेळी तुम्ही हिंदी बोलले नाही का? मराठी भाषेला कुणीही नका लावू शकत नाही. राजकारण मधून हवा तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शिरसाट यांनी केला.

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलीस गोत्यात; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

 

मंत्री शिरसाट यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी भाष्य केले. भाषणात राज ठाकरे यांनी गंभीरपणे मुद्दे मांडले. राज ठाकरे यांनी सरळ सांगितले असेल मी कुणावर टीका करेल असे म्हटले नसेल.

 

 

बाणा राज यांनी टिकवला. हा युतीचा मेळावा नव्हता. उद्धव म्हणाले एकत्र राहणार, पण राज यांनी दुजोरा दिला का? असा सवाल त्यांनी केला. ते एकत्र आल्यावर आमच्या पोटात दुखत आहे असं समजू नका.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला “जय गुजरात”चा नारा ,शिवसैनिकांमध्ये चलबिचल

 

ते एकत्र आल्यास आम्हाला आनंद आहेच, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. तर राज यांचं भाषण नो पोलटिक्स असे होते. लोकांना राज ठाकरे यांचे भाषण भोवले असा दावा त्यांनी केला.

 

ठाकरे गटाकडून बॅनरबाजी;चुकीची रिक्षा पकडलीत, परत या! अन्यथा गुजरातला…,

बाबा बुवा करणे तुम्हाला चांगले माहीत आहे, किती बाबा असतात हे लोकांना माहीत आहे. तुम्ही इतरांची चिंता करू नका. राज यांच्या पक्षातून जाणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे,

 

इम्तियाज जलील यांचा दावा;शिंदेंकडून दगाफटक्याची भीती म्हणून राज-उद्धवना एकत्र आणण्याचा प्लॅन फडणवीसांचा

 

त्यामुळे पडझड उद्धव ठाकरे गटाची झाली, त्यामुळे त्यांना चिंता होती, असा खोचक टोला शिरसाटांनी हाणला. राज यांच्या भाषेचा अर्थ चांगला होता, कोण नवरा होता आणि कोण नवरी माहीत नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले ;भाजपवाल्यांना कधी कोणाच्या लग्नात बोलवू नका

 

पण युती होणार नाही,, आम्हाला राज आणि उद्धव यांचा स्वभाव माहीत नाही,, पहिली पायरी टाकली तरी अनेक पायऱ्यानंतर मंदिर दिसणार आहे.

 

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल !

युती एवढ्या सहजपणे होत नाही. काँग्रेस मेळाव्याला आली नाही, राष्ट्रवादीचे दोन नेते आले, त्यांना किती अधिकार आहे माहीत नाही. जर युती झाल्यास महाविकास आघाडी एकत्र राहणार नाही, असे भाकीत शिरसाटांनी केले.

 

 

आम्हाला कोणताही परिणाम होणार नाही, एकत्र येण्याचा आम्हाला कोणताही फटका बसणार नाही, पण एकत्र आल्यास त्यांना पक्षांतर्गत फटका बसेल, असे सांगायला शिरसाट विसरले नाहीत.

 

 

 

Related Articles