राहुल गांधींचा इशारा;आम्ही निवडणूक आयोगाला सोडणार नाही

Rahul Gandhi's warning; We will not leave the Election Commission

bj admission
bj admission

 

 

मतदार यादी फेरपडताळणीवरून बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उपटत आहेत.

 

 

मतदारार यादी फेरपडताळणीवरून विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस खूप आक्रमक झाला असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला

 

महाराष्ट्रातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्राकडून मिळाला IAS दर्जा

कठोर शब्दात इशारा दिला आहे. राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

राहुल गांधी म्हणाले की “मी निवडणूक आयोगाला एक संदेश देत आहे. निवडणूक आयोगाला असं वाटत असेल की यातून पळवाट काढता येईल, तर तो त्यांचा भ्रम आहे. आम्ही त्यांच्या मागे लागू आणि कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

फडणवीसांचा शब्द;पण भाजपात प्रवेशाच्या दिवशीच जयंत पाटलांना मंत्रिपदाची शपथ पाहिजे ?

राहुल गांधींचे हे विधान केवळ निवडणूक आयोगाला थेट संदेश मानला जात नाही, तर २०२४ नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांची झलक म्हणूनही पाहिलं जात आहे.

 

बिहारमधील मतदार यादी फेर पडताळणीद्वारे दलित, मागास आणि गरीब लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक न्यायाच्या बाजूने आवाज उठवणाऱ्यांनाच लक्ष्य करण्यासाठी ही प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे

सर्व कार्यक्रम रद्द करून एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी

हा लढा केवळ एका प्रक्रियेविरुद्ध नाही तर संपूर्ण व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आहे. देशातील जनता त्यांच्यासोबत आहे आणि ते मागे हटणार नाहीत, असं ठणकावून सांगितलं आहे.

 

 

राहुल गांधी यांनी बिहार सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही फटकारलं आहे. राज्य सरकार केंद्राच्या कटात सहभागी आहे आणि लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

असदुद्दीन ओवेसी प्रचंड संतापले ,तरुणांना घेतले फैलावर ;पाहा VIDEO

दरम्यान, राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु विरोधक याविरोधात मोठं आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

एकनाथ शिंदे गटाचे मंत्री म्हणाले ठाकरे ब्रँड संपणार नाही
मतदार यादी विशेष फेरपडताळणीनंतर बिहार मधील मतदार यादीतून ५१ लाख मतदारांची नावे वगळण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

फेरपडताळणीत १८ लाख मृत मतदारांची नावं आढळली आहेत. तर बिहारबाहेर किंवा इतर विधानसभा मतदारसंघात गेलेल्या २६ लाख मतदारांची ओळख पटली आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांसोबत गुप्त भेटी बाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

तसंच ७ लाख मतदारांची नावं दोन ठिकाणी नोंद आहेत. अशा एकूण ५१ लाख मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत, त्यामुळे बिहारमध्ये खळबळ माजली आहे.

 

 

Related Articles