रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, 90 कोटींवरुन बावनकुळेंशी भिडले

Rohit Pawar's sensational allegation, clash with Bawankule over 90 crores

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर 90 कोटींचा दंड माफ केल्याचा आरोप केला आहे. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मी कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ केला,

 

हा आरोप सिद्ध करा. अन्यथा, राजकीय संन्यास घ्या असं जाहीर आव्हानच दिलं आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर देत गंभीर आरोप केले आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना १०-१० लाखांची मदत

“अवैध उत्खनन केले म्हणून परतूर तहसीलदारांनी 55.98 कोटी रुपये तर दुसऱ्या एका प्रकरणात जालन्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी 38.70 कोटी असा एकूण 94.68 कोटी रुपये दंड थोठावला शिवाय आरोपी कंपनीचे साहित्य जप्त केले.

 

या कंपनीने विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता आयुक्तांनीही त्या कंपनीचे अपील फेटाळले. कंपनीने महसूल मंत्र्याकडे अपील केले

OBC नेते आक्रमक बारामतीत शरद पवार,अजित पवारांवर जोरदार टीका

आणि आपल्या महसूल मंत्र्यांनी संबंधित कंपनीला केवळ 1 टक्के म्हणजेच 17 लाखाचा दंड भरण्यास सांगून कंपनीला मोकळे केले शिवाय त्यांचे जप्त केलेले साहित्य देखील परत देण्याचे आदेश दिले,” असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

 

“शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्यांनी काही केले तर लगेचच अव्वाच्या सव्वा दंड वसुली करणारे सरकार आज एवढे दयाळू होऊन 94 कोटी रुपयांचा दंड 17 लाखापर्यंत आणून ‘मेघा इंजीनियरिंगवर एवढा डिस्काऊंट का आणि कुणाच्या आदेशाने देतंय? महाराष्ट्र सरकार तोडपाणी करतंय की इलेक्टोरल बाँडच्या देणगीचं ऋण फेडतंय?,” असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

महाराष्ट्रात मतचोरी कशी केली याच्या डॉक्युमेंट्रीची लिंक SMS पाठविण्यास TRAI चा नकार

“फारच मोठ्ठा शोध लावला तुम्ही.!! महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला ९० कोटींचा दंड माफ केला, हा आरोप सिद्ध करा. अन्यथा, राजकीय संन्यास घ्या. करा सिद्ध,” असं जाहीर आव्हान बावनकुळे यांनी एक्सवरुन रोहित पवारांना दिलं आहे.

 

यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “रोहित पवारांनी काल मी एका कंपनीला 90 कोटी रुपयांचा दंड माफ केला आहे असा आरोप लावला होता,

 

मी आज सांगितलं की रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा, आता ते म्हणत आहेत की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता,

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना १०-१० लाखांची मदत

खरंतर माननीय पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे रोहित पवार म्हणत आहेत त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली होती, कुठलाही दंड माफ केला नाही.

 

म्हणून मी म्हटले आहे की राजकीय संन्यास घ्यावा, प्रसिद्धीच्याच झोतात राहण्याकरिता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातून मिळू पाहत आहेत”.

 

आघाडीकडून भाजपा आणि नितीश कुमार यांना रोखण्यासाठी बिहारमध्ये मोठा निर्णय
“खोट्या आरोपातून कधीही प्रसिद्धी मिळत नाही, राजकीय आरोप करताना उठसुट आरोप करून राजकीय उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा अनेक प्रयत्न करत आहेत/ त्यांनी हा प्रयत्न केला आहे अपरिपक्वतेचे लक्षण रोहित पवारांचं आहे. राजकारणात ते नवीन आहेत. आधी अभ्यास करावा आणि मगच त्यांनी कुठलाही आरोप लावावा,” असा टोलाही त्यांनी लगावला.

 

“11 जुलैला जो विधिमंडळात प्रश्न होता तो मागच्या काळात झालेल्या प्रश्नाबाबत होता, एका उत्खनच्या प्रकरणात कुठलाही दंड तेव्हाही माफ केलेला नव्हता आताही दंड माफ केलेला नाही,” असा दावा त्यांनी केला आहे.

सोशल मीडिया वर घातली बंदी तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

“रोहित पवार यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचं आहे. त्यांना विरोधी पक्षात मी एकटाच लढवय्या आहे असं दाखवायचं आहे, म्हणून जरा अभ्यास केला पाहिजे. तेव्हाच्याही महसूलमंत्र्यांनी केवळ स्थगिती दिली होती आणि माझ्या कार्यकाळात कधीही कुठलाही दंड माफ केला गेला नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

“आदरणीय बावनकुळे साहेब, मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही. तुमच्याच पक्षाचे आमदार मा.बबनराव लोणीकर यांनी 11 जुलै 2025 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्ही स्वतः महसूल मंत्री म्हणून उत्तर दिले आहे.

मोठी राजकीय घडामोड;राज ठाकरेंची मनसे मविआत घेण्याच्या हालचाली

दिलेले उत्तर आणि प्रश्न तुम्हीच बघा, तुम्ही केवळ दंडच माफ केला नाही तर जप्त केलेले साहित्यदेखील परत करण्याचे आदेश दिले होते हे विसरलात का? एकंदरीतच यावरून असे दिसून येते की,

 

गावातील लोक जेव्हा पाणंद रस्ते किंवा गावातील रस्ते यासाठी मुरूम काढतात तेंव्हा तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता पण दुसरीकडे धनदांडग्यांनी अवैध उत्खनन केलं असतानाही कोट्यवधींचा दंड माफ करता.हेच का तुमचं सर्वसामान्यांचं सरकार?,” असं प्रत्युत्तर त्यांनी पोस्टमधून दिलं आहे.

भारतीय हवामान विभागाचा 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान मोठा इशारा

राहिला प्रश्न राजकीय संन्यासाचा तर आम्ही तुम्हाला राजकीय संन्यास घ्या म्हणत नाही फक्त जनतेच्या प्रश्नाचे उत्तर द्या. आहे का हिंमत? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

 

दुसरीकडे रोहित पवारांनी म्हटलं आहे की, “दोन दिवसांपूर्वी देवाभाऊंची पहिल्या पानावर जाहिरात देण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांचे उदात्तीकरण या जाहिरातीतून करण्यात आलं होतं.

भारत-अमेरिका तणावात आता एलॉन मस्कची उडी

नेत्यांना खुश करण्यासाठी काही लोकांनी तो उपक्रम केला होता. अशा नेत्याने जाहिरात दिली आहे असं आम्हाला समजलं आहे जो सत्तेत आहे मात्र भाजपात नाही”.

 

 

Related Articles