सरन्यायाधीशांसोबतच्या घटनेवर पवारांनी व्यक्त केली चिंता,म्हणाले ही देशासाठी धोक्याची घंटा
Pawar expressed concern over the incident with the Chief Justice, said it was a warning bell for the country

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या वकिलाने थेट सरन्यायाधीशांना लक्ष्य करत त्यांच्या बूट फेकण्याचा प्रयत्न केला.
पण त्याचा हा प्रयत्न सुद्धा अयशस्वी ठरला. कारण या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला तत्काळ ताब्यात घेत त्याला न्यायालयाच्या बाहेर नेले.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ,वकिलाला अटक
सोमवारी (ता. 6 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे देशात खळबळ उडाली. थेट देशाच्या सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याने आणि तो सुद्धा सर्वोच्च न्यायालयात यामुळे अनेकांनी याबाबत संताप सुद्धा व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर “ही देशासाठी धोक्याची घंटा” असल्याचे म्हणत घडलेल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घटनेबाबत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,
हैदराबाद गॅझेटचा जीआर कसा काढला? मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते आक्रमक
“लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे.
आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. ह्या घटनेचा मी निषेध करतो व कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो.”
247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविरोधात एका वकिलाने घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर त्या वकिलाने गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला.
ज्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्या वकिलाला ताब्यात घेतले आणि न्यायालयाच्या बाहेर नेले. यावेळी त्या वकिलाने “आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” असे मोठ्याने म्हटले.
बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा;दोन टप्प्यात मतदान, मतमोजणी 14 नोव्हेंबरला
महत्त्वाची बाब म्हणजे, इतकं काही होऊन सुद्धा सरन्यायाधीशांनी सुनावणीवर कोणताही परिणाम होऊ न देता, “या सर्व गोष्टींमुळे विचलित होण्याची गरज नाही. आपण याने विचलित होत नाही. अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.” असे म्हटले.









