धक्कादायक;IPS आत्महत्या प्रकरनाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचीच आत्महत्या
Shocking; The officer investigating the IPS suicide case commits suicide
हरियाणाचे आयपीएस अधिकारी वाय पुरण कुमार यांच्या आत्महत्येच्या तपासात मोठा ट्विस्ट आला आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली.
तुम्ही सकाळी वापरणारी कोलगेट खरी आहे काय? पाहा :VIDEO
रोहतकच्या सायबर सेलमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून तैनात असलेले संदीप कुमार हे वाय पुरण कुमार यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करत होते. त्यांनी सुसाईड नोटमध्ये आपण सत्यासाठी आयुष्य समर्पित करत असल्याचा उल्लेख केला आहे.
संदीप कुमार यांनी रोहितकतमधील शेतात सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ आणि तीन पानांची सुसाईड नोट सोडली आहे. संदीप कुमार यांनी आरोप केला आहे की,
वाय पुरण कुमार हे भ्रष्टाचारी पोलीस होते आणि आपला भ्रष्टाचार उघड होईल अशी भीती त्यांना होती. त्यांनी असाही आरोप केला की आयपीएस अधिकाऱ्याने जातीभेदाच्या मुद्द्याचा वापर करून व्यवस्था हायजॅक केली.
सुसाईड नोटमध्ये अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, भ्रष्टाचाराचे आरोप समोर आल्यानंतर वाय पुरण कुमार यांची बदली करण्यात आली. संदीप कुमार यांनी वाय पुरण कुमारच्या गनमनला दारू कंत्राटदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना पकडले होते.
दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
एका गुंडाने धमकी दिल्यानंतर कंत्राटदार वाय पुरण कुमारला भेटला होता. लाचखोरीचे आरोप समोर आल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याने त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या केली.
मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ संदेशात संदीप कुमार म्हणाले की, वायएस पूरण कुमार यांना रोहतक रेंजमध्ये तैनात केल्यानंतर त्यांनी प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांच्या जागी भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली.
“या लोकांनी फायली ब्लॉक केल्या, याचिकाकर्त्यांना बोलावले आणि पैसे मागून त्यांचा मानसिक छळ केला. बदल्यांच्या बदल्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केले गेले,” असा आरोप त्यांनी केला.
उद्यापासून वादळी पावसाचा इशारा ; हवामान विभागाची माहिती
“त्यांच्या भ्रष्टाचाराची मुळे खूप खोलवर रुजली आहेत. त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली आहे,” असा आरोप संदीप कुमार यांनी केला. “त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. हा जातीचा मुद्दा नाही. सत्य बाहेर आले पाहिजे. ते भ्रष्ट होते,” असा आरोप त्यांनी केला.
“मी या सत्यासाठी माझे जीवन अर्पण करत आहे. मला अभिमान आहे की मी प्रामाणिकपणे उभा आहे. देशाला जागृत करण्यासाठी हे महत्वाचे आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
जगात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या आजाराचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात :आरोग्य यंत्रणेत खळबळ
संदीप कुमार यांनी रोहतकचे पोलिस प्रमुख नरेंद्र बिजार्निया यांचंही कौतुक केलं. वाय पुरण कुमार यांच्या त्यांच्या सुसाईड नोटमध्ये असलेल्या 10 अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा उल्लेख होता. त्यानंतर बिजार्निया यांची बदली करण्यात आली आहे.







