पुण्याकडे जाण्यासाठी विमानाने घेतली उड्डाण ,पण पोहोचले भलत्याच ठिकाणी;प्रवाशांमध्ये उडाली खळबळ

The plane took off for Pune but arrived at the wrong place; passengers were in a panic

 

 

मागील काही दिवसांपासून इंडिगो या विमान कंपनीच्या सेवेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून देशातील अनेक शहरांमध्ये कंपनीकडून विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संताप पसरला आहे.

 

अशातच गुरुवारी रात्री नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांसोबत धक्कादायक प्रकार घडला. रात्री उशिरा इंडिगोच्या विमानाने नागपूरहून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान पुण्याला येण्याऐवजी थेट हैदराबादला पोहोचलं आणि मध्यरात्री या प्रवाशांना हैदराबाद विमानतळावर सोडण्यात आलं.

बँक खात्यात मिनिमम बॅलेन्स आणि फ्री ट्रान्झाक्शन बाबत, RBI कडून नियमात मोठा बदल

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी नागपूर-पुणे असे इंडिगोचे विमान होते. मात्र या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते पुण्याऐवजी हैदराबादला पोहोचलं.

 

नागपूरहून उड्डाण घेतल्यानंतर पुणे विमानतळावर लँड करण्यासाठी तिथे जागा नसल्याची माहिती प्राप्त झाल्याने हे विमान हैदराबाद विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं इंडिगोकडून सांगण्यात आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा आदेश ,आता या 19 देशातील नागरिकांना अमेरिकेत नो एन्ट्री

इंडिगोचे विमान पुण्याऐवजी हैदराबादला गेल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेक जण आपल्या महत्त्वाच्या कामानिमित्त पुण्याकडे निघाले असताना हैदराबादला उतरवण्यात आल्याने या प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

 

तसंच हैदराबादला पोहोचल्यानंतरही जवळपास तासभर या प्रवाशांना विमानातच बसवून ठेवण्यात आलं होतं. मात्र नंतर काही प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सर्वांना हैदराबाद विमानतळावर उतरवण्यात आलं.

 

रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नवा नियम

उड्डाणांमध्ये होणारा प्रदीर्घ विलंब आणि ती रद्द होण्याचे प्रकरण डीजीसीएने गांभीर्याने घेतले असून याबाबत इंडिगो कंपनीकडून विस्तृत स्पष्टीकरण मागितलं आहे.

 

‘सद्यःस्थितीचा तपास करत आहोत, विमानाचे संचलन पूर्वपदावर आणण्यासाठीच्या उपायांवर विमान कंपनीशी चर्चा करत आहोत,’ असं डीजीसीएने म्हटलं आहे.

EVM मशीनची पूजा केली ,झाला उमेदवारांवर गुन्हा दाखल

इंडिगोमध्ये अलीकडच्या काळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. विमान उड्डाणस्थितीत असतानाच्या कर्तव्याची कालमर्यादा (फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन – एफडीटीएल) निश्चित झाल्यानंतर व त्यासंदर्भातील नियम लागू झाल्यानंतरच या विमान कंपनीला कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.

 

नव्या नियमांतर्गत वैमानिकांचा साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. रात्रकालीन विमान उतरवण्याची संख्याही मर्यादित करण्यात आली आहे.

अमेरिका 30 हून अधिक देशांना प्रवेश करण्यास घालणार बंदी; लवकरच यादी जाहीर

या गोंधळाबाबत इंडिगोने गुरुवारी कोणतेही निवेदन जारी केले नसले तरी, गेल्या दोन दिवसांपासून संचलनातील अनेक अनपेक्षित आव्हानांमुळे कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे, असे कंपनीने बुधवारी स्पष्ट केले होते. शिवाय प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी माफीही मागितली.

बॉलिवूड स्टार ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी फेब्रुवारी उजाडेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

 

इंडिगोची विमानसेवा सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत राहिल्यानंतर गुरुवारी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. दिवसभरात दिल्ली, मुंबई, बंगळुरूसह देशातील

राज्यातील 600 शाळा बंद होणार? अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार

अन्य विमानतळांवरून 550 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. यापैकी जवळपास 191 उड्डाणे दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद मार्गांवरील होती. मोठ्या प्रमाणात उड्डाणं रद्द झाल्यामुळे विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला. यादरम्यान इंडिगो एअरलाइनने एक निवेदन जारी केलं आहे.

 

या निवेदनात इंडिगोने म्हटलंय, ‘गेल्या दोन दिवसांत इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये प्रचंड व्यत्यय आला आहे. यामुळे प्रभावित झालेल्या आमच्या सर्व ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो.

 

इंडिगो टीम MOCA, DGCA, BCAS, AAI आणि विमानतळ ऑपरेटर्सच्या मदतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे. परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.’

सरकारचा मोठा निर्णय ;आधार कार्डावर आधारित तयार केलेली सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द

दिल्ली विमानतळावरून 172, मुंबईतून किमान 118, बंगळुरूमधून 100, हैदराबादमधून 75, कोलकात्यामधून 35, चेन्नईमधून 26 आणि गोव्यातून 11 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं.

 

याशिवाय अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला. यामुळे देशभरातील विमानतळांवर हजारो प्रवाशांना तासनतास रखडावं लागलं आणि मनस्ताप सहन करावा लागला. सर्वत्र प्रवाशांची गर्दी, गोंधळ आणि मनस्ताप असं चित्र दिसलं.

 

महाराष्ट्र देशात सर्वात जास्त कर्जाचा डोंगर असणारे राज्य
इंडिगोने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली त्यावर हवाई वाहतूक मंत्री नायडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कंपनीला आपलं कामकाज तातडीने सुरळीत करण्याचे तसंच भाडेवाढ न करण्याचे निर्देश दिले.

 

विमान रद्द होण्यासंबंधी प्रवाशांना आगाऊ सूचना दिल्या जाव्यात, हॉटेलमध्ये निवासासह प्रवाशांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असं नायडू यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांना बजावलं.

महाराष्ट्र देशात सर्वात जास्त कर्जाचा डोंगर असणारे राज्य

नागरी हवाई वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सद्यस्थिती आणि उपाययोजनेचा आढावा घेण्यात आला.

 

यावेळी इंडिगोने डीजीसीएला सांगितलं की, 8 डिसेंबरपासून विमान उड्डाणांची संख्या कमी केली जाईल, तसंच 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ववत स्थिर विमानसेवा सुरू होईल.

पुण्याकडे जाण्यासाठी विमानाने घेतली उड्डाण ,पण पोहोचले भलत्याच ठिकाणी;प्रवाशांमध्ये उडाली खळबळ

Related Articles