हवामान विभागाचा राज्यात थंडीचा यलो अलर्ट; कसं असेल हवामान?
Meteorological Department issues yellow alert for cold in the state; What will the weather be like?

देशभरासह राज्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील थंडीमुळे देशात गारठा वाढला आहे. याचाच परिणम महाराष्ट्रात झाला आहे. उत्तरेकडील भागात कडाक्याची थंडी असल्याने त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रही गारठला आहे.
चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहिणी बनून 21 कोटी लाटले
राज्यात थंडीची लाट आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात थंडीचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांसाठी थंडीची ही लाट कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
भाजपचेच माजी मंत्री म्हणाले शिंदे गटाच्या आमदाराचा विजय बोगस मतदारांमुळे
गेल्या 24 तासांत शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज आहे.
भारतातील 113 शहरे डेंजर झोनमध्ये
सध्या पुण्यात तापमानाचा पारा 8.9 अंशांवर पोहोचला आहे. मुंबईतही तापमानाचा पारा घसरला असल्याने थंडी वाढली आहे. हवामान खात्याने राज्यात थंडीचा यलो अलर्ट जारी केला असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हा अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वात निचांकी तापमान धुळे जिल्ह्यात नोंदवलं गेलं आहे. धुळ्यातील तापमान 5.3 अंश सेल्सिअस आहे. तर परभणीमध्ये 5.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दुसरं मोठं संकट, 6 राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात…
पुणे, गोंदिया, जळगाव, अहिल्यानगर या भागात तापमानाचा पारा 9 अंशापर्यंत घसरला आहे. पुढील काही दिवसांत हा पारा आणखी कमी होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, देशातील सर्वात निचांकी तापमान पंजाबमधील गुरूदासपूर नोंदवण्यात आलं आहे. तेथील तापमान 4.5 अंश सेल्सिअस इतकं नोंद करण्यात आलं आहे.
मराठवाड्यातील राहुल गांधीं आणि एकनाथ शिंदेच्या एकत्रित” या ” फोटोची होतेय राज्यभरात चर्चा
एकीकडे कडाक्याची थंडी असताना केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात हवामान खात्यान पावसाचा इशारा दिला आहे. 10, 11, 12 आणि 13 डिसेंबर असे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी देण्यात आला आहे.





