अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी मोठ्या धक्कादायक खुलाशाने खळबळ

Shocking revelations in Ajit Pawar's death case create a stir

 

 

28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रात भयानक घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान दुर्घटनेत निधन झाले.

आता सरकारकडून गर्ल्स हॉस्टेल आणि लॉजसाठी नवे नियम लागू

अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला. अशातच आता त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत.

 

अजित पवार यांचा घातपात झाला असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्यानंतर दिल्लीतून रोहित पवार यांनी

मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय

अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा धक्कादायक खुलासा केला. अशातच आता अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सर्वात शॉकिंग अपडेट समोर आली आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स जळलेल्या अवस्थेत सापडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ब्लॅकबॉक्स कसा जळू शकतो? विमान अपघातात काहीही झालं तरी ब्लॅकबॉक्स अबाधित राहतो,

RSS च्या कार्यक्रमाला सलमान खान

याचा तपास कामात उपयोग केला जातो! मग नेमकी याच प्रकरणात ब्लॅकबॉक्स कसा काय जळला? विमान खराब दर्जाचे होते का? असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

विमान अपघात प्रकरणातील ब्लॅक बॉक्स जळाल्यामुळे डेटा रिकव्हर करण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी तातडीने पारदर्शक माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळें होणार सासू ,ची मुलगी रेवती सुळेंचं लग्न ठरलं

मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ब्लॅक बॉक्स परदेशात रिकव्हर होणार असून अपघाताची माहिती “लवकरच” मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

मात्र तोपर्यंत विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कोणत्या वाहनातून निघाले? ते कुठल्या रोडवर ट्रॅफिकमध्ये अडकले होते काय़ तसेच संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज,

VIDEO;महाराष्ट्राच्या शेजारी विमान शेतात कोसळले

या सर्व बाबी 28 जानेवारी 2026 रोजीच्या दिनांक आणि वेळेसह महाराष्ट्राला कळवाव्यात, अशी त्यांनी विनंती केली आहे.अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी उपलब्ध सर्व पुरावे आणि तांत्रिक माहिती सार्वजनिक करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, या मागणीमुळे संबंधित यंत्रणांवर पारदर्शकतेचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार सातत्यानं पाठपुरावा करत आहेत. याच संदर्भात त्यांनी एक्स समाजमाध्यमावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही,

IT कंपन्यांना बुरे दिन, पाच दिवसात 3 लाख कोटी गमावले

तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी !

 

दरम्यान, अजित पवारा यांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे 28 जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

 

 

Related Articles