मोदी-शहांचा ‘गुजरात पॅटर्न’;उद्धव ठाकरेंची कोंडी करणार ?

Modi-Shah's 'Gujarat pattern'; Uddhav Thackeray's dilemma?

 

 

 

 

सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील २० जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. भाजपनं ५ विद्यमान खासदारांची तिकिटं कापली आहेत.

 

 

 

पैकी २ खासदार मुंबईचे आहेत. विशेष म्हणजे भाजपनं मुंबईतील २ मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदारांची तिकिटं कापून

 

 

 

नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा सामना करण्यासाठी भाजपनं भाकरी फिरवली आहे.

 

 

 

मुंबई शहर ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही ठाकरे मुंबईतील ताकद कायम ठेवून आहेत. मुंबईत ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे.

 

 

 

त्यामुळे इथे शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा मुकाबला झाल्यास त्याचा फायदा ठाकरेंना होईल. महायुतीच्या जागा कमी होतील. त्यामुळेच शिंदेंना मुंबईत फारशा जागा सोडायच्या नाहीत, असा प्लान भाजपनं आखला आहे.

 

 

 

मागील निवडणुकीत मुंबईत शिवसेना, भाजपनं प्रत्येकी ३ जागा लढवल्या. दोन्ही पक्षांनी १०० टक्के यश मिळवलं. युतीचे सहाही उमेदवार विजयी झाले.

 

 

 

शिवसेनेतील फुटीनंतर दोन खासदार शिंदेंसोबत गेले. या दोन्ही जागांवर शिंदेंनी दावा केला. दक्षिण मध्य आणि वायव्य मुंबईत शिंदेंचे खासदार आहेत.

 

 

 

पण यातील वायव्य मुंबईत भाजप लढण्याची शक्यता आहे. त्याबदल्यात शिंदेंना ठाण्याची जागा सोडली जाईल. याचा अर्थ मुंबईत शिंदे केवळ एक जागा लढवतील आणि भाजप ५ जागांवर उमेदवार देईल.

 

 

 

मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे सामना झाल्यास त्याचा फायदा ठाकरे घेतील. सहानुभूतीच्या आधारे ते कमबॅक करतील अशी भीती भाजपला आहे.

 

 

 

ठाकरेंनी लोकसभेला मुसंडी मारल्यास त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत, मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल. त्यामुळे मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

 

 

 

मुंबईत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन प्रस्थापितांविरोधात असलेली मतदारांची नाराजी दूर करण्याचा भाजपची योजना आहे. त्यामुळेच उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल,

 

 

 

ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या ऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजनदेखील डेंजर झोनमध्ये आहेत.

 

 

 

 

त्यांच्या जागी आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. तसं झाल्यास मुंबईत सगळ्याच भाजप खासदारांचा पत्ता कापला जाईल. ठाकरेंच्या उमेदवारांविरोधात भाजपचे नवे चेहरे असतील.

 

 

२०२२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं अनेक मतदारसंघांत नवे उमेदवार दिले होते. जुन्यांविरोधात असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यातून भाजप केला.

 

 

 

पहिल्या १६० उमेदवारांच्या यादीतून ३८ आमदारांना नारळ देण्यात आला होता. याचा फायदा भाजपला झाला. भाजपनं १८२ पैकी १५६ जागा जिंकल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या ५७ जागा वाढल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *