माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 30 जणांवर गुन्हे दाखल
Cases registered against 30 people including former MP Imtiaz Jaleel
राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले.
राज्यात छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह विरोधक एकवटले होते. जोडे मोरो आंदोलनासह विरोधक आक्रमक झाले होते.
संभाजीनगरमध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान गाढवाचा वापर करण्यात आल्याचा आक्षेप घेत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएम पक्षाच्या 30 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गाढवाचा वापर केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत.
अमित शाह यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत जलील आणि त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान गाढवाचा वापर करण्यात आला, ज्यामुळे पोलिसांनी यावर आक्षेप घेत गुन्हा दाखल केला आहे. आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
राज्यसभेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधक आक्रमक झाले होते. एक वक्तव्य केलं.
यावेळी अमित शाह म्हणाले की, आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे. सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणायचे.
“त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर स्वर्गात जागा मिळाली असती,” असे शाह म्हणाले. राज्यसभेत झालेल्या संविधानावरील दोन दिवसीय चर्चेच्या समारोपात शाह यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात
काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावेळी शाह यांनी आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन झाली असल्याचे म्हटले. यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता.
संभाजीनगर येथे MIM कडून झालेल्या आंदोलनात गाढवाचा वापर करत जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आक्षेप घेत इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे 30 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
एमआयएम पक्षाने या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, हे आंदोलन शांततापूर्ण होते आणि जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी करण्यात आले होते.
मात्र, पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एमआयएमच्या आंदोलनावर आणि पोलिसांच्या कारवाईवर राजकीय चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.