अजित पवारांच्या मागणीने जागावाटप रखडले ,शिंदेंचे काही खासदार कमळावर

Ajit Pawar's demand stalled the seat allocation, some of Shinde's MPs on Kamala

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेशातील ५१ जणांचा समावेश आहे.

 

 

 

पण उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्रात मात्र अद्याप जागावाटप जाहीर झालेलं नाही. भाजपनं शिवसेनेला ९ आणि राष्ट्रवादीला ४ जागा देऊ केल्या आहेत.

 

 

 

भाजपची स्वत:ची ३५ उमेदवारांची यादी तयार आहे. आपापल्या जागा वाढवून घेण्यासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार प्रफुल पटेल यांचे प्रयत्न सुरू आहेत.

 

 

 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आहेत. ते १४ जागांसाठी आग्रही आहेत. तर लोकसभेचा केवळ १ खासदार असलेली राष्ट्रवादी ११ जागांची मागणी करत आहे.

 

 

 

यामुळे जागावाटप जाहीर होऊ शकलेलं नाही. याबद्दलचा निर्णय आता दिल्लीतच होईल. सेनेनं आधी २२ जागा मागितल्या होत्या. तर राष्ट्रवादीनं १६ जागांची मागणी केली होती.

 

 

 

पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. माझ्यासोबत असलेल्या १३ खासदारांचे मतदारसंघ माझ्याकडेच राहायला हवेत, अशी आग्रही मागणी शिंदेंनी शहांकडे केली.

 

 

 

यासाठी शिंदे पूर्ण जोर लावत आहेत. तर राष्ट्रवादी किमान ६ जागांसाठी आग्रही आहे. शिंदेंच्या दोन ते तीन खासदारांना धनुष्यबाणाऐवजी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगायचं, अशी भाजपची योजना आहे.

 

 

 

भाजपकडून यंदा महिलांना जास्त संधी दिली जाऊ शकते. पंकजा मुंडे (बीड), नवनीत राणा (अमरावती), डॉ. हीना गावित (नंदूरबार) यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

 

 

 

याशिवाय नांदेडमधून मीनल खतगावकर, जळगावातून स्मिता वाघ, धुळ्यातून धरती देवरे यांची नावं आघाडीवर आहेत. प्रताप पाटील चिखलीकर सध्या नांदेडचे खासदार आहेत. सुभाष भामरे धुळ्याचे आणि उन्मेष पाटील जळगावचे खासदार आहेत.

 

 

 

रावेरच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे, उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन आणि दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीबद्दल पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याबद्दल उत्सुकता आहे.

 

 

धुळ्यातून धरती देवरे यांचं नाव चर्चेत आहे. त्या धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. गुजरात भाजपचे अध्यक्ष आणि खासदार सी. आर. पाटील यांच्या त्या कन्या आहेत.

 

 

तर नांदेडमधून मीनल खतगावकर यांचं नाव आघाडीवर आहे. नुकतेच भाजपवासी झालेले नेते अशोक चव्हाण यांच्या त्या भाच्या आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *