शरद पवार गटाचा नेता -भाजप केंद्रीय मंत्र्यांची अदानींच्या घरी बैठक

Sharad Pawar group leader-BJP Union Ministers meet at Adani's house

 

 

 

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर शरद पवार आणि भाजपमध्ये एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

शरद पवार यांचा गुरुवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने अजित पवार यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

 

त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. 10 दिवसांपूर्वी अजितदादा गटाचे नेते प्रफुल पटेल यांनीही शरद पवार  यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गुरुवारी दुपारी दिल्लीत उद्योगपती गौतम अदानी

 

यांच्या घरी शरद पवार गटाचा एक बडा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शरद पवार हे भाजपशी हातमिळवणी करणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.

 

या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते मेहबुब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मेहबुब शेख यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना हे वृत्त निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले.

 

शरद पवार गटाचा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्याचे वृत्त तुम्हाला कोणी दिले, माहिती नाही. काल सकाळपासून आम्ही सगळे दिल्लीत शरद पवारांच्या 6 जनपथ निवासस्थानीच होतो.

 

कालपासून शरद पवार कुठेही गेले नाहीत. तसेच आमच्या पक्षाचे कोणी प्रमुख नेते भाजपच्या नेत्यांना जाऊन भेटले नाहीत. शरद पवार गटात कोणतेही दोन गट किंवा वेगवेगळे मतप्रवाह नाहीत.

 

शरद पवार जो निर्णय घेतील तोच सर्व खासदार आणि आमदारांसाठी अंतिम असेल. पण शरद पवार आणि भाजपची बोलणी सुरु असल्याच्या बातम्या कोण पेरतंय, हे माहिती नाही, असे मेहबुब शेख यांनी म्हटले.

 

अजित पवार हे काल शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते. त्याचा गैर अर्थ काढायची गरज नाही. भाजपसोबत झालेल्या चर्चेत आमचे कोणते नेते सहभागी होते,

 

हे समजले तर आम्ही त्यावर बोलू शकतो. काल शरद पवार यांना भेटून आमचे सगळे प्रमुख नेते थेट विमानतळावर गेले. मात्र, आता आमचे नेते भाजपच्या नेत्यांना भेटल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत.

 

या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. यामधून काही निष्पन्न होणार नाही, या चर्चा केवळ चर्चांपुरताच मर्यादित राहतील, असा विश्वास मेहबुब शेख यांनी व्यक्त केला.

 

प्रुफल पटेल हे शरद पवारांना भेटले असतील तर ठीक आहे. त्या दोघांनी एकत्र काम केले आहे. पक्ष बदलला म्हणून एखाद्याशी बोलणं बंद करणे, असे राजकारण आम्ही करत नाही.

 

विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी शरद पवारांचा सुसंवाद आहे. पण शरद पवारांची वैचारिक भूमिका वेगळी आहे, असेही मेहबुब शेख यांनी सांगितले.

 

दरम्यान अजितदादांनी काल शरद पवारसाहेबांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ही चांगली बाब आहे. पण त्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा लावला गेला.

 

असं झालं तर आम्हाला आनंदच होईल, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केलं आहे. आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की

 

दोन्ही पवारांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, याचा फायदाच होईल असेही काकडे म्हणाले. भविष्यात काय होईल सांगता येत नाही असंही ते म्हणाले.

 

तसे झाल्यास आनंदाची गोष्ट असेल असंही अंकुश काकडे म्हणाले. सुनंदा पवार यांच्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी देखील मोठं वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय पवार साहेब हेच घेतील असंही अंकुश काकडे म्हणाले. पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील अडचण राहणार नाही

 

असंही यावेळी अंकुश काकडे म्हणाले. पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्याला कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी विरोध करेल असं वाटत नाही असेही काकडे म्हणाले.

सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्याचा आदर केला पाहिजे.

 

दोन्ही पिढ्या कित्येक वर्षे आम्ही एकत्र राहतोय. मला ही वैयक्तिकरित्या वाटते की, एकत्र यावे. याबाबतचा निर्णय पवार साहेब आणि अजितदादाच घेतील

 

पवार साहेब यांचा काल वाढदिवस होता. कुटुंबातील सगळे त्यांना भेटण्यासाठी गेले होते यात गैर नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे ,अशी कार्यकर्त्याची इच्छा आहे,

 

मलाही तसेच वाटतेय. राजकारणात कार्यकर्ता महत्वाचा असतो. त्यामुळे विखुरलेले राहण्यापेक्षा एकत्र येणे योग्य ठरेल. आम्ही स्वतंत्र काम करतो, कुटुंबीयांची ताकद आहे,

 

त्यामुळे एकत्रित यावे अस मला ही वाटते. नवीन लोकांना संधी दिली पक्षाने हे चांगले आहे. राज्यात आलेल्या विधानसभा निकालावर माझा विश्वास नाही.

 

राज्यात एवढी नाराजी अनेक प्रश्नांवर असताना हे निकाल पटत नाही. अजितदादा भेटतील तेव्हा मी शुभेच्छा नक्की देईल, असेही सुनंदा पवार यांनी म्हटले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *