भाजपचेच आमदार फडणवीस सरकारवर नाराज

BJP MLAs are angry with Fadnavis government

 

 

 

 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप अन् काँग्रेसची युती झाली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मात्र या युतीवर नाराज आहेत. भाजप आणि काँग्रेसच्या युतीबाबत मला काहीही माहिती नाही,

 

त्यांनी मला काहीही न विचारता हा निर्णय घेतला की काय, याबाबत माहिती घ्यावी लागेल. मी स्वतःला त्यांचा पालक समजत होतो, अशी शाब्दिक टीका भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी फडणवीसांच्या ‘त्या’ लाडक्या आमदारावर केली आहे.

 

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांना माहिती देताना स्पष्ट केले की, मी कार्यकर्त्यांना न्याय देणारा व्यक्ती आहे.

 

भाजप आमदार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोबत येण्याचे आवाहन माध्यमांद्वारे करू नये. मी त्यांचा पालक आहे, असं मी तरी मानतो. पण, ते मला पालक मानतात की नाही? हे मला माहिती नाही.

 

मी या संदर्भात कोणतीही तक्रार करणार नाही. मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता आहे, असे सांगून भाजप आमदार सुभाष देशमुख यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपले स्वतंत्र पॅनेल असेल, असे स्पष्ट केले आहे. फडणवीसांचे लाडके आमदार म्हणून सचिन कल्याणशेट्टी यांची ओळख आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि कार्यकारी जिल्हाध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याशी युती केली.

 

भाजप आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या या निर्णायवर भाजपचे वरिष्ठ आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख चांगलेच संतापले आहेत. काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कधी झाला?

 

भाजपच्या कोअर कमिटीत मी आहे की नाही? काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कोणालाही मान्य नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया आ.सुभाष देशमुखांनी माध्यमांसमोर दिली आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *