भाजप आमदार करणार IAS अधिकाऱ्यांसोबत लग्न

BJP MLA to marry IAS officer

 

 

 

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचे नातू भव्य बिश्नोई यांचा शाही विवाह सोहळा २२ डिसेंबरला संपन्न होईल. भव्य बिश्नोई आदमपूरचे आमदार आहेत.

 

 

ते भाजपचे नेते असून त्यांचा विवाह राजस्थानच्या आयएएस परी बिश्नोई यांच्याशी होईल. या लग्नाला तीन लाखांपेक्षा अधिक पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

लग्नानंतर नवी दिल्ली, हरयाणातील आदमपूर आणि राजस्थानच्या पुष्करमध्ये रिसेप्शन होतील. नवी दिल्लीतील भव्यदिव्य रिसेप्शनला केंद्रीय मंत्री आणि व्हीव्हीआयपी उपस्थित राहणार आहेत.

 

 

माजी खासदार कुलदीप बिश्नोई यांनी हिसारच्या आदमपूरमध्ये ५५ गावं फिरुन लोकांना लग्नाची आमंत्रणं दिली. याबद्दल बिश्नोई यांना अनोखी प्रथा सांगितली.

 

 

‘माझ्या विवाहावेळी माझ्या वडिलांनी आदमपूरच्या गावांमध्ये फिरुन लोकांना आमंत्रणपत्रिका दिल्या होत्या. आता मी माझ्या मुलाच्या लग्न सोहळ्यासाठी आमंत्रणं देत आहे,’ असं कुलदीप बिश्नोई म्हणाले.

 

 

 

भव्य बिश्नोईचा विवाह २२ डिसेंबरला उदयपूरला होणार आहे. यानंतर राजस्थानच्या पुष्करमध्ये २४ डिसेंबरला पहिलं रिसेप्शन होईल. त्यात ५० हजार पाहुणे सहभागी होतील.

 

 

यानंतर बिश्नोई यांच्या हिसार जिल्ह्यात २६ डिसेंबरला दुसऱ्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात दीड लाखांहून अधिक जण उपस्थित असतील.

 

 

 

२७ डिसेंबरला नवी दिल्लीत तिसरं रिसेप्शन होईल. त्या कार्यक्रमाला तीन हजार व्हीव्हीआयपी, केंद्रीय मंत्री आणि अधिकारी हजर राहतील.

 

 

भाजप आमदार भव्य बिश्नोई यांचे आजोबा चौधरी भजनलाल यांनी दोनवेळा हरयाणाचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते हरयाणातून तीनवेळा लोकसभेवर आणि एकदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

 

 

हरयाणाचे कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. भजनलाल यांच्या पत्नी जसमा देवी आदमपूरच्या आमदार होत्या. कुलदीप बिश्नोई यांच्या पत्नी रेणुकादेखील आदमपूर आणि हांसीच्या आमदार राहिल्या होत्या. तर कुलदीप बिश्नोई आमदार आणि खासदार राहिले आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *