बॉलिवूड अभिनेत्रीवर ईडीची मोठी कारवाई ;कोट्यवधींची मालमत्ता केली जप्त

ED's big action against Bollywood actress; property worth crores seized

 

 

 

 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजची कोट्यवधींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

 

 

 

बीटकॉइन प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीनं जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये राजच्या पुण्यातील बंगल्याचा देखील समावेश आहे.

 

 

 

 

ईडीनं राज कुंद्राची एकूण 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए (मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायदा) कायद्यांतर्गत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

 

 

 

 

शिल्पा शेट्टीच्या नावे आलेला जुहू येथील रहिवाशी फ्लॅट तसेच राज कुंद्राच्या नावे असलेला पुण्यातील बंगला आणि शेअर्स करण्यात ईडीनं जप्त केले आहेत.

 

 

 

 

 

युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी राज कुंद्राला गेन बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याचा मास्टर माईंड आणि प्रवर्तक अमित भारद्वाज यांच्याकडून

 

 

 

 

285 बिटकॉइन्स मिळाल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. सध्या या बिटकॉइन्सची किंमत 150 कोटींहून अधिक आहे, असं म्हटलं जात आहे.

 

 

 

राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. जवळपास दोन महिने राज हा तुरुंगात होता. सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला.

 

 

 

ॲडल्ट फिल्म प्रकरणी राजला न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. ‘हॉटशॉट्स’ अॅपचा वापर करुन अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला होता.

 

 

 

राजचा UT 69 हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात आर्थर रोड जेलमध्ये राज कुंद्राला आलेले अनुभव दाखवण्यात आले.

 

 

 

तुरुंगामधील इतर कैदींनी राजला कशी वागणूक दिली? हे देखील या चित्रपटात दाखवण्यात आलं. या चित्रपटात राजनं स्वत: काम केलं आहे.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *