कंगनाने केली थेट मुख्यमंत्र्यांच्या सूट ची मागणी
Kangana directly demanded the Chief Minister's exemption

पहिल्याच प्रयत्नात खासदार झालेली अभिनेत्री कंगना रणौतचा शपथविधी काल संपन्न झाला. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडून गेली आहे.
खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना संध्याकाळच्या सुमारास महाराष्ट्र भवनात पोहोचली. तिनं राहण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी केली.
पण नियमानुसार हा सूट देऊ शकत नसल्याचं महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्यांनी तिला सांगितलं. यानंतर कंगनानं फोनाफोनी सुरु केली.
तिनं महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला फोन केला. पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर कंगनाला माघारी परतावं लागलं.
नवनिर्वाचित खासदार असलेल्या कंगनाला अद्याप शासकीय निवासस्थान मिळालेलं नाही. शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची माहिती पुढे आली होती.
तिनं महाराष्ट्र सदनात जाऊन काही खोल्यांची पाहणी केली. सदनातील अधिकाऱ्यांनी तिला पहिल्या मजल्यावर नेलं. कंगना मुंबईची रहिवासी असल्यानं
तिनं अधिकाऱ्यांना खोली देण्याची विनंती केली होती. अधिकाऱ्यांनी कंगनाला एक खोली दाखवली. पण ती कंगनाला पसंत पडली नाही.
यानंतर कंगनाला आणखी एक खोली दाखवण्यात आली. ही खोली राज्यातील एका मंत्र्याला दिली जाते. त्या खोलीसही कंगनानं नकार दिला. अखेर कंगनानं मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी केली.
पण प्रोटोकॉलनुसार हा सूट मुख्यमंत्र्यांशिवाय कोणाला देता येत नाही, असं अधिकाऱ्यांकडून तिला सांगण्यात आलं. यानंतर कंगनानं महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला फोन केला. पण या नेत्यानंदेखील तिची मदत केली नाही. त्यामुळे कंगना निराश झाली.
कंगना १५ मिनिटांमध्ये महाराष्ट्र सदनातून निघून गेली. माध्यम प्रतिनिधींनी तिला भेटीमागचं कारण विचारलं. तेव्हा एका मैत्रिणीसोबत कॉफी प्यायला महाराष्ट्र सदनाच्या कँटिनमध्ये आले होते,
असं उत्तर कंगनानं दिलं. पण या भेटीत कंगना कँटिनमध्ये गेलीच नव्हती. ती थेट सदनाच्या पहिल्या मजल्यावर गेली होती, अशी माहिती नंतर पुढे आली.