महाराष्ट्रातील “या” शहरांचे तापमान 45 अंशांवर,हवामान विभाग काय म्हणतो ?

The temperature of these cities in Maharashtra is 45 degrees, what does the weather department say?

 

 

 

 

 

राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

 

 

त्यातच राज्यातील अनेक शहरांचे तापमान चाळीस अंशाच्या वर गेले आहे. काही शहरांनी तापमानाची 45 ओलांडली आहे. यामुळे

 

 

 

 

या शहरांमध्ये अघोषित संचारबंदी दिसून येत आहे. राज्यात जळगाव आणि अकोला शहरे सर्वाधिक हॉट शहरे ठरली आहे. या शहरांचे तापमान अनुक्रमे 45.3 आणि 45.5 अंश सेल्सियस होते.

 

 

 

विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट शहर ठरले आहे. अकोलाचा पारा 45.5 अंशांवर पोहोचला आहे. यंदाचा उन्हाळ्यातील अकोल्यात गुरुवारी उच्चांक तापमानाची नोंद झाली.

 

 

 

तर यवतमाळ 43.05, अमरावती 43.2, चंद्रपूर 43.2, वर्धा 43.02 आणि नागपुरात 41.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसासाठी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

 

 

 

अकोला आणि जळगाव शहर हॉट सिटी म्हणून ओळखले जाते. हॉट सिटीमध्ये दुपारी शहरातील रस्ते सामसूम पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने अजून तीन दिवस तापमान वाढलेले असणार असल्याचा इशारा दिला आहे.

 

 

 

त्यामुळे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असा सल्ला दिला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडत असाल तर डोक्यावर टोपी, रुमाल, गॉगल आणि पाण्याची बॉटल घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

 

 

 

धुळे, अहमदनगर, नाशिक, मालेगाव, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड, अमरावती, बुलढाणा, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, यवतमाळ या शहरांचे तापमान 40 अशांच्या वर गेले आहे.

 

 

 

 

 

वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, मुंबईमध्ये उन्हाचा फटका नागरिकांना बसत आहे. मुंबईत पारा प्रचंड वाढला असून आरसिटी मॉलमध्ये तापमानात स्नोचा अनुभव घेण्यासाठी गर्दी होत आहे.

 

 

 

 

मुंबईमध्ये उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. मुलांना सुट्ट्या ही आहेत. त्यामुळे मुंबईमधील कृत्रिम थंडीची ठिकाणे असलेल्या ठिकाणी गर्दी होत आहे.

 

 

 

 

घाटकोपरच्या आरसिटी मॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्नो किंगडममध्ये स्नोचा अनुभव घेण्यासाठी बच्चे कंपनीसह पालकांची मोठी गर्दी होत आहे.

 

 

 

 

या ठिकाणी उणे आठ तापमानात स्नोचा अनुभव घेता येतो. कुलू मनाली किंवा काश्मीरचा अनुभव अवघ्या काही मिनिटांत घेण्यासाठी पालक हा पर्याय निवडत आहे.

 

 

 

इथे स्नो सोबत, वेगवेगळे खेळ, स्नो फॉलचा ही आनंद घेता येत असल्याने सुट्टी आणि उन्हाळा म्हणून इथे गर्दी होताना दिसत आहे.

 

 

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

जालना, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे

 

 

 

 

नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी व हिंगोली जिल्हयात व नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम

 

 

 

स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफवत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 24 ते 30 मे दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

 

 

 

 

 

संदेश :

सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.

 

 

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

 

 

पीक व्‍यवस्‍थापन

मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये कापूस पिकाची लागवड करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी

 

 

 

 

जमिनीची खोली 60 ते 100 सेंमी असावी मध्यम ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत तूर पिकाची लागवड करावी. चोपन व क्षारयुक्त जमिनीत तूर पिकाची लागवड करू नये.

 

 

 

तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात. योग्य निचऱ्याच्या मध्यम ते भारी जमिनीत मुग/उडीद या पिकांच्या लागवड करावी.

 

 

 

एकदम हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही. पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत भुईमूग पिकाची लागवड करावी.

 

 

 

 

 

भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

 

 

 

 

 

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या भुईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मध्यम ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिनी मका पिकाची लागवड करावी.

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काळी व कसदार, भुसभुशीत गाळाची, पोयटयाची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केळीची मृग बाग लागवड करावी. लागवडीसाठी क्षारयुक्त जमिनीची निवड करू नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.

 

 

 

 

केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. मध्यम ते भारी प्रतीची पाण्याचा चांगला निचरा होणारी, थोडीशी आम्लयुक्त जमिनीत आंबा पिकाची लागवड करावी.

 

 

 

 

 

चोपन व चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये. जमिनीची खोली कमीतकमी 1.5 ते 2 मीटर असावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

 

 

 

 

नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.

 

 

 

 

वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अतिरिक्त फुटव्यांची विरळणी करावी. मुरमाड, अत्यंत हलक्या, डोंगर उताराच्या जमिनीत तसेच मध्यम खोल जमिनीत सिताफळ लागवड करावी.

 

 

 

 

भाजीपाला

खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज इत्यादींची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

 

 

 

 

 

पशुधन व्यवस्थापन

तापमानात वाढ झाल्यामूळे दूधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा,

 

 

 

 

दुपारी जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणी द्यावे.

 

 

 

 

तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

 

 

 

 

पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.

 

 

 

 

सामुदायिक विज्ञान

उन्हाळ्यामध्ये अतिउन्हामध्ये काम करत असताना अतिशय घाम येतो. घशाला कोरड पडते व शरीरातील पाणी कमी होते. त्यामूळे दवाखान्यात भरती देखील व्हावे लागते.

 

 

 

तेव्हा अशा बाबी टाळण्यासाठी डोकयाला रूमाल बांधावा व अंगात सनकोट किंवा घरात कापूस वेचणीकोट अथवा पूर्ण भायाचा शर्ट असेल तर तो घालावा. अंगावर फिक्या रंगाचे कपडे घालावे. जेणेकरून उन्हाची किरणे परावर्तित होतील. घाम आल्यामूळे शरीरातील क्षार कमी होतात.

 

 

 

 

यावर उपाय म्हणून लिंबू, मीठ व साखर यांचे शरबत करून ठेवून थोड्या थोड्या वेळाने घेत रहावे. तसेच काम करत असताना सावलीत अधून मधून विश्रांती घ्यावी.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *