पक्षात येण्यास इच्छुक असणाऱ्यांना शरद पवारांची साद !
Sharad Pawar's support for those who are willing to join the party!

लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहेत. आमच्या कडे जे लोक आले त्यांना आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना खासदार अमोल कोल्हे
यांच्या नेतृत्त्वात त्यांच्या भागातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. लोकांना मदत करण्याच्या भावनेने जर कोणी येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे,
असे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले. माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली.
विधानसभा निवडणुकीत पुण्यात तुमच्या पक्षाला किती जागा मिळतील असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले, पुण्यात किती जागा मिळू शकतात,
याबाबत आम्ही आताच काही बोलणार नाही. पण आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचे आहे. त्यासाठी तीनही पक्ष एकत्र बसतील आणि निर्णय घेतील.
त्यामुळे आम्हाला इतक्याच जागा द्या याच जागा द्या असे आम्ही करणार नाही. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत आम्ही तीनही पक्ष मिळून लढणार आहोत. लोकांच्या समोर जाणार आहोत आणि या राज्यात स्थिर सरकार आणणार आहोत.
यावर बोलताना शरद पवार म्हणाले, लोकसभेत 2019 मध्ये राज्यात काँग्रेसला एक आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला
48 पैकी 31 जागा दिल्या.याचा अर्थ महाविकास आघाडीला जनतेने मोठी साथ दिली. लोकांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा केल्या त्या पाहता आता राज्यातील विधानसभा निवडणुकही जिंकणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोणीही सुपरमॅन बनन्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला दिला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले,
भाजपचे कोणीतरी देव, सुपरमॅन बनायला निघाले होते. पण आता त्यावर भाजप आणि आरएसएसचे लोकच बोलू लागले आहेत. याची शहाण्या नेत्यांनी दखल घ्यायला हवी. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
तुम्हाला सोडून गेलेले सहकारी परतीचा प्रयत्न करत आहेत का, असा सवाल विचारला असता, ‘तुमच्याकडे माहिती असेल तर मलाही सांगा,’ अशी मिश्किल टीपप्णीही यांनी यावेळी केली.
देवदत्त निकम यांना विधानसभेची जबाबदारी देणार का, यावर बोलताना शरद पवार म्हणाले म्हणाले. देवदत्त निकम यांना दिलेली जबाबदारी ते अगदी चोखपणे पार पाडतात.
हा माझा व्यक्तीश: अनुभव आहे. त्यामुळे सहाजिकच कर्तृत्ववान माणसाचे कर्तृत्व वाया जाणार नाही याची काळजी नेतृत्त्वाने घ्यायची असते.