गुवाहाटीला गेलेले सगळे आमदार आघाडीवर

All the MLAs who went to Guwahati are in the lead.

 

 

 

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात 107 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचे

 

पाहायला मिळते. पहिल्या कौलनुसार महायुतीला 193 जागांवर आघाडी मिळाली असून 89 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर, इतरांमध्ये 8 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे.

राज्यानं गेल्या अडीच वर्षांत अभूतपूर्व सत्तासंघर्ष पाहिला आहे. अशातच ज्या घडामोडींमुळे सत्तासंघर्ष उद्भवला, त्या घडामोडी म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील बंडाळी.

 

अगदी शिवसेनेतील फुटीपासून महाविकास आघाडी कोसळणं आणि थेट शिवसेनेतील प्रबळ नेतृत्त्व असलेले एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यापर्यंत अनेक हादरवणाऱ्या घटना महाराष्ट्रानं याची देही,

 

याची डोळा अनुभवल्या. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत बंडावेळी गेलेल्या आमदारांचं काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानूसार गुवाहाटीला गेलेले सर्व आमदार आघाडीवर असल्याचं समोर येत आहे.

288 मतदारसंघाच्या सुरुवातीच्या कलानूसार, भाजपला 115, शिवसेना शिंदे गटाला 58, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला 42 जागा मिळताना दिसत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *