पुढचे ४८ तास अस्मानी संकट, या भागांना पावसाचा अलर्ट जारी…

Sky crisis for next 48 hours, rain alert issued for these areas...

 

 

 

 

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र राज्यात हिवाळी मौसमात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पश्चिमी विक्षोभामुळे देशभरातील हवामानात मोठा बदल झाला आहे.

 

 

आजही देशभरात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून आज महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

तर काही भागात ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभरात विविध ठिकाणी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आला आहे.

 

 

राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही राज्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळते.

 

 

 

अशात पुढच्या ४८ तासांमध्ये राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. काही ठिकाणी गारपीट आणि पावसामुळे पिकांचा चिखल झाला. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा आहे, तर मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या

 

 

 

काही भागांमध्ये पुढच्या २४ तासांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

आयएमडीने पुण्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नजीकच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

 

तर विदर्भालाही आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

पुढील ४८ तास विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर या पावसामुळे तापमानात घट होणार आहे.

 

 

अरबी समुद्रात चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे.

 

 

हवामान खात्याने बीड, धाराशिव, लातूर, परभणी, अकोला, हिंगोली, अमरावती, नागपूर, जालना, नांदेड, गोंदिया येथे पावसाच्या सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

 

 

 

डिसेंबरच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *