1 ते 03 मार्च दरम्यान वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता
Chance of rain with thunderstorm from 1st to 03rd March
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 01 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात, दिनांक 02 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे
. दिनांक 01 मार्च रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 02 मार्च रोजी बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 3 ते 4 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे.
कमाल तापमानात पुढील चोवीस तासात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला:
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 01 ते 07 मार्च पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व दिनांक 08 ते 14 मार्च दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 ते 12 मार्च 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा तसेच तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मालाचे ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन;दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मालाचे ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या गहू पिकास दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे.
गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता,
वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मालाचे ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची लवकरात लवकर काढणी व मळणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मालाचे ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. कमाल तापमानात झालेली वाढ,
वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकास 65 ते 70 दिवसांनी पिक फुलोऱ्यात असतांना तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावत ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी केलेल्या हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा लागवड केलेल्या हळद पिकात हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.
हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.
कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.
दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ,
वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता,
काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता,
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.
दिनांक 01 ते 03 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 01 व 02 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
वातावरणात टोकाचे बदल होऊन गैर मौसमी पाऊस पडतो आणि गारा जेव्हा पडतात तेव्हा जनावरांना त्यांच्या घरामध्ये बांधणे/गोठ्यात बांधणे. जनावरांना गोठ्यात ठेवणे, जनावरांना उबदार वातावरणामध्ये ठेवणे. उघड्या विद्युत तारांचा संपर्क टाळा. गैर मौसमी वादळ वारं पाऊस आणि गारा पडतात तापमान अचानकपणे बदलते तेव्हा जनावरांच्या तापमानाचे निरीक्षण करा. जनावरांना कार्बोदकेयुक्त आहार द्या.
स्थानिक उपलब्धतेनुसार वनस्पतीच्या विविध स्त्रोतापासून रासायनिक रंगाला पर्यायी नैसर्गिक होळीचे रंग तयार करता येतात. पळसाची फुले, इंग्रजी झेंडूची फुले, मंजिष्ठा, हळद, मेहंदी, बीट, आवळा आणि नीळ यांच्या घट्ट द्रावणामध्ये आरारूट मिसळून होळीचे नैसर्गिक रंग तयार करता येतात.
पिवळा, केशरी निळा, हिरवा, काळा या रंगछटा विकसित केल्या गेल्या आहेत. हे रंग भुकटीच्या स्वरूपात असून कपडयावरील तसेच शरीरावरील रंग धुऊन काढण्यास अत्यंत सोपे आहेत. हे रंग कमी खर्चात तयार करता येतात आणि या व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक ही अत्यल्प असून निव्वळ नफा भरपूर आहे.