Parbhani Live; News;सेलू शहरात चोरटयांनी साडेचार लाख पळवले
Parbhani Live News;;Thieves steal Rs 4.5 lakh in Selu city
गेल्या काही दिवसापासून परभणी जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरु झाले असून चोऱ्यांमुळे सर्वसामान्य जनतेत चिंतेचे वातावरण आहे, चोरटे बारकाईने लक्ष ठेऊन पैशावर डल्ला मारत आहेत.
काल रात्री चोरटयांनी सेलू शहरात चोरीची घटना घडली . सेलू म्हशीच्या गोठ्यात कपाटामध्ये ठेवलेले चार लाख ५५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले.
हि घटना २१ मे रोजी सकाळी सेलू येथील शाहुनगरात उघडकीस आली. या प्रकरणी २२ मे ला सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुळ डोळझापे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचा शाहु नगर येथे म्हशीचा गोठा आहे. या गोठ्यातील आलमारीत त्यांनी दुधाचे आलेले पैसे, म्हशीच व्यवहाराची रक्कम ठेवली होती.
१९ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास फिर्यादी लग्नकार्यासाठी नाशिक येथे गेले. लग्न झाल्यानंतर २० मे ला रात्री परत आले. २१ मे रोजी सकाळी म्हशीच्या गोठ्यात असलेले कपाट उघडून पाहिले असता
हे हि वाचा …. परभणी जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु;बँकेतून २६ हजार लांबवले
त्यांना कपाट ठेवलेले ४ लाख ५५ हजार रुपये दिसून आले नाही. अज्ञात चोरट्याने सदर रक्कम लंपास केली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. शेख करत आहेत.
दरम्यान काल परभणी शहरातील वसमत रोडवर असलेले एस.एस. मोबाईल शॉप हे मोबाईल शोरुम चोरट्यांनी फोडल्याचे गुरुवार २२ मे रोजी सकाळी उघडकीस आले.
शोरुममधून मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून जवळपास ८० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज आहे. नेमका किती माल चोरीला गेला आहे हे हिशोबानंतरच लक्षात येईल.
वसमत रोडवर झरकर यांचे एस.एस. मोबाईल शॉप आहे. बुधवार २१ मे रोजी रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान नेहमी प्रमाणे दुकान बंद करण्यात आले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास दुकान शेजार्यांना शोरुमचे शटर उचकटलेले दिसले.
हे हि वाचा…BREAKING NEWS;मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मोबाईल बाबत घेतला महत्वाचा निर्णय
त्यांनी याची माहिती झरकर यांना दिली. घटनास्थळी येऊन पाहणी केल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती नवा मोंढा पोलिसांना देण्यात आली.
स्थागुशाचे पोनि. विवेकानंद पाटील यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक, ठसे पथकालाही पाचारण करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार मोबाईल, टिव्ही, साउंड सिस्टम, स्पीकर
हे हि वाचा..शिवसेना कार्यालयात भूत ? स्वतः; मंत्र्यांनीच दिली माहिती
आदी साहित्य मिळून जवळपास ८० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसत आहे. चोरटे सीसीटिव्ही कॅमेर्यामध्ये वैâद झाले आहेत. या प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.








