आता गुरुजींसाठी टेन्शनची बातमी ; ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार ‘परीक्षा

Now there is tense news for Guruji; Senior teachers will also be tested

 

yashwant college 1
yashwant college 1

 

 

शिक्षकांसाठी एक चिंतेची बातमी आहे ,कारण विद्यार्थ्यांबरोबरच आता शिक्षकांची परीक्षा होणार असल्यामुळे गुरुजींचे टेन्शन वाढणार आहे.

हे सुद्धा वाचा ;……. कुर्बानीसाठी अतिशय स्वस्त दरात शेतकऱ्याकडून बकरे विक्रीला

शिक्षकांना सेवेची 12 वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी तर 24 वर्षे सेवा केल्यानंतर निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. यावर्षी 2 ते 12 जून या कालावधीत राज्यात एकाच वेळेस प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा ;…….“या 233” महाविद्यालयांवर विद्यापीठाने घातली प्रवेशबंदी ;पहा 233 महाविद्यलयांच्या नावाची संपूर्ण यादी

विशेष म्हणजे यावेळी सर्व ज्येष्ठ शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत पात्र न ठरणाऱ्या गुरुजींना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील अनुभवी गुरुजी टेन्शनमध्ये आले आहेत.

यावर्षी पहिल्यांदाच प्रशिक्षणाच्या वेळी घेण्यात येणारी चाचणी आणि त्याचे गुणदान हा चर्चेचा विषय ठरत आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण चाचणीसाठी 100 गुण, स्वाध्यायसाठी 100 गुण,

लेखन चाचणीसाठी 50 गुण आणि अहवाल लेखनासाठी 50 , अशी 300 गुणांची परीक्षा होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान आणि

हे सुद्धा वाचा ;…….अशोक चव्हाण भाजपामध्ये जाऊन जत्रेतील नुरा कुस्त्या खेळत आहेत

नंतर दोन्ही किमान मूल्यांकन प्रक्रियेत 50 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. अन्यथा नवीन नोंदणी आणि शुल्क भरून विनंतीनुसार प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. राज्यस्तरीय प्रशिक्षण पुणे येथे होणार आहे.

26 ते 29 मे दरम्यान विभागस्तरीय व जिल्हास्तरीय टीओटी होणार आहे. त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ञ मार्गदर्शक 2 जून ते 12 जून या कालावधीत तालुकास्तरीय शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण देतील.

हे सुद्धा वाचा ;…….WEATHER ALERT;हवामान विभागाने सांगितले ,जूनमध्ये किती पाऊस पडणार

या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा. शिक्षण हक्क कायदा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, ऑनलाइन शिक्षण,

सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, पर्यावरणीय आपत्ती व्यवस्थापन, व्यवसाय अध्यापनाचा ताण व्यवस्थापन मूल्यांकन, कृती दुरुस्त्या इत्यादी 22 विषयांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा ;…….mahayuti crises;अमित शहांकडे भाजप आमदारांनी केली अजित पवारांची तक्रार

प्रशिक्षणादरम्यान दर तासिकेचे 10 गुणांच्या चाचणीसह 10 स्वाध्याय पूर्ण करावे लागणार आहे. संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, शेवटच्या दिवशी 50 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

10 दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात प्रत्येक प्रशिक्षणार्थीना प्रत्येक तासिकेला हजर राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक दिवशी परिपाठानंतर आदर्श शाळांवर चर्चा होणार आहे.

प्रशिक्षण पूर्व काळात पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी असणार आहे प्रत्येक घटकांनंतर 10 गुणांची बहुपर्यायी ऑनलाईन चाचणी होणार आहे. संपूर्ण राज्यात ही चाचणी एकाच वेळी होणार असल्याने वेळापत्रक सारखेच राहणार आहे.

हे सुद्धा वाचा ;……. BREAKING NEWS;मान्सून च्या पहिल्या आठवड्यातच धरणातून पाणी सोडण्याचा मोठा निर्णय;सतर्कतेचा इशारा

26 ते 29 मे दरम्यान विभागस्तरीय व जिल्हास्तरीय टीओटी होणार आहे. त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ञ मार्गदर्शक 2 जून ते 12 जून या कालावधीत तालुकास्तरीय शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण देतील.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *