“या” सात जणांना आमदारकीची लॉटरी ,आज होणार शपथविधी ?
MLA lottery for "these" seven people, swearing-in ceremony will be held today?
राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. तर पाच जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहे.
भाजपला तीन, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांकडे सोमवारी फाईल पाठवण्यात आली. मात्र मंगळवारी सकाळपर्यंत कोणतेही नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले नव्हते.
भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे.
शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.
भाजपने पक्ष संघटनेतील दोन जणांना विधानपरिषेदवर संधी दिली. तसेच बाबूसिंग महाराज राठोड यांना विधान परिषदेवर पाठवून बंजारा समाजाला संधी दिल्याचा संदेश भाजपने दिला आहे.
तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मनीषा कायंदे दुसऱ्यांदा परिषदेवर संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निकटवर्तीयांना सधी दिल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यपालांनी विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्त्या करण अपेक्षित असताना 12 पैकी 7 जागांवर राजकीय नेत्यांची वर्णी लागल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच रिक्त पाच जागा या इच्छुकांना आशेवर झुलवत ठेवण्याासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 12 आमदारांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती.
पण त्यावेळचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली नव्हती. त्यानंतर राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आले. या सरकारची एक यादी चर्चेत होती मात्र त्यांनी यादी मागे घेतली.
नव्या सात नावांची शिफारस करण्यात आली. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारची नावे मागे घेण्याच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
राज्यपाल नियुक्ती आमदारांचा शपथविधी आज दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडणार आहे. विधीमंडळामध्ये उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे.
सध्या विधीमंडळात शपथविधीची तयारी सुरू आहे. राज्यपाल नियुक्ती विधानपरिषद आमदारकीसाठी 12 लोकांची नियुक्ती गेल्या 5 वर्षापासून रखडली होती.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यपाल नियुक्त 12 पैकी 7 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली आहे. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे.
यानुसार भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येत आहे.
तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. आज हे सातही आमदार शपथ घेणार आहेत.
आज दुपारी 12 वाजता राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे. विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधान परिषद सदस्यांना शपथ देतील.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. याविरुद्ध ठाकरे गटाकडून सकाळी साडेदहा वाजता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने अॅडव्होकेट सिद्धार्थ मेहता सकाळी साडेदहा वाजता याचिका दाखल करणार आहेत.