लाडक्या बहिनी चिंतेत ;पैसे मिळणार कि नाही ;अजितदादा म्हणाले ….
Beloved sister is worried; whether she will get money or not; Ajit Dada said....

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून, राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यादरम्यान राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार की नाही की याची चिंता लागली आहे.
पात्र महिलांना हफ्त्यांसह दिवाळीचा बोनासही मिळाला आहे. पण आता निवडणुका लागल्याने योजनेचं काय होणार अशी चिंता महिलांना सतावत असतानाच
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. महायुतीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत सांगितलं.
केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण योजना सुरु केली असून या या योजनेमुळे राज्य कंगाल होईल अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान ही योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. तर या योजनेला टच केलात तर लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिला आहे.
“महाराष्ट्रातील जनतेचं आयुष्य बदलणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही केल्या. आमच्या योजनांना मिळणारा अभुतपूर्व प्रतिसाद पाहून विरोधक गडबडले आहेत.
मी घाबरले आहेत असं म्हणणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे ते गडबडले आहेत. आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा योजनेची अंमलबजावणी कधी होणारच नाही असं म्हणायचे.
फॉर्म भरुन घेतल्यानंतर पैसे देणार नाहीत असं बोलत होते. आता अडीच कोटी माय-माऊलींच्या खात्यात साडे सात हजार जमा झाले आहेत,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, “विरोधकांना आमच्या बहिणींच्या आयुष्यात होत असलेला सकारात्मक बदल पचनी पडत नसल्याने हे पैसे निवडणूक होईपर्यंत मिळतील असं सांगत आहेत.
पण मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने जबाबदारीने सांगतो की, यामध्ये पहिल्यांदा 10 हजार कोटींची, नंतर 35 हजार कोटींची तरतूद केली होती.
अशा प्रकारे 45 हजार कोटींची वर्षभराची तरतूद केली आहे. योजना तात्पुरती नाही याची खात्री मला सर्व महिलांना द्यायची आहे”.
“निवडणुका येतील, जातील. हे दर पाच वर्षांनी ठरलं आहे. पण हे पैसे तुमचा अधिकार आहे, तो कोणी काढून घेऊ शकत नाही. याउलट भविष्यात योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मदतीत आणखी वाढ करण्याचा सूतोवाच
मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आम्ही फार विचारपूर्वक मांडली असून, यशस्वपीणे तिची अंमलबजावणी करत आहोत,” असंही अजित पवारांनी सांगितलं.