मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेसेज, पोलीस यंत्रणा सतर्क
Threat message of placing bombs at six places in Mumbai, police system on alert

अज्ञात क्रमांकावरुन मुंबई पोलिसांनी धमकीचा मेसेज आलाय. मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मसेजमध्ये देण्यात आली आहे.
बुधवारी रात्री पुणे पोलिसांनाही असाच धमकीचा मेसेज आला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आलाय. या धमकीच्या मेसेजनंतर पोलीस सतर्क झालेय. तपास तात्काळ सुरु झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा एक मेसेज आला आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यातआल्याचे त्या मेसेजमध्ये म्हटले आहे.
त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
याआधी पुणे पोलिसांच्या कंट्रोलरुमध्येही धमकीचा मेसेज आला. गुरुवारी रात्री पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमच्या वॉट्सअप नंबरवर पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याचा मेसेज आला होता.
त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. बॉम्ब शोधक पथके देखील पुना हॉस्पिटलमधे तैनात करण्यात आली होती. धमकीचा हा मेसेज करणाऱ्या व्यक्तिचा पोलीस शोध घेत आहेत.