मुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये ;मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्र्यांना डच्चू?

Chief Minister in action mode; Cabinet expansion to two ministers?

 

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या काही आमदारांनी त्यांच्या गटाच्या मंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त केलीय. काही आमदारांनी दोन ते तीन मंत्र्यांची तक्रार केलीय.

 

 

आमदारांची कामं होत नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीय. मंत्र्यांना वारंवार सांगूनही कामं होत नसल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्या आहेत.

 

 

त्यामुळे आमदारांची मर्जी आणि पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी मुख्यमंत्री पुन्हा अॅक्शन मोडवर येणार का? की मुख्यमंत्री मंत्र्यांना पाठिशी घालणार असा सवाल उपस्थित झालाय.

 

 

एकनाथ शिंदे यांच्या गटातील नाराजी ही अनेकदा समोर आली आहे. मात्र पहिल्यांदाच शिंदे गटातील 15 ते 20 आमदारांनी दोन ते तीन मंत्र्यांची तक्रार केली आहे.

 

 

आमदारांनी सहा महिन्यांचा लेखाजोखा आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. या अगोदर देखील आमदार नाराज असल्याच्या चर्चा अनेक वेळा समोर आल्या होता.

 

 

कोणत्या दोन ते तीन मंत्र्यांवर आमदार नाराज आहेत त्या आमदारांची नावे समोर आलेली नाही. हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात काही मंत्र्याची खाती आणि मंत्री बदलण्याची शक्यता आहे

 

 

तानाजी सावंत हे सध्या विरधकांच्या रडारवर आहे. सध्या त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे तानाजी सावंतांविषयी सत्ताधारी पक्षामध्ये काही भूमिका आहे

 

 

हे पाहावे लागणार आहे. तसेच संदीपान भुमरे आणि दीपक केसरकर यांच्या नावाची देखील चर्चा होत आहे. दहापैकी दोन ते तीन मंत्री कोण आहे याबाबत अद्याप कोणती माहिती आलेली नाही.

 

 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांची नाराजी परवडणारी नाही. त्यामुळे या प्रकरणी एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 

 

ही नाराजी शिंदे कशी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आमदरांना निवडणुकांना सामोरे जायचे आहे. निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी आमदारांची कामे होणे गरजेचे आहे.

 

 

जर मंत्री आमदाराची कामे करणार नसतील तर मंत्री बदला अशी मागणी आमदरांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये येणार का? आणि जर अॅक्शन मोडमध्ये आले तर कोणाची विकेट जाणार हे पाहावे लागणार आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *