अजित पवार हे महायुतीत राहतील ,पण राजकारणात काहीही घडू शकते ;आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Ajit Pawar will remain in the Grand Alliance, but anything can happen in politics; MLA's statement stirs excitement

 

 

 

 

विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

अजित पवार हे महायुतीतच राहतील, अशी आमची अपेक्षा आहे. पण राजकारणात कधीही काही घडू शकतात त्यामुळे नेमकं काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल,

 

 

अंस संजय शिरसाट म्हणाले. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील

 

यांनी कुणाला चर्चेला बोलायला माहित नाही पण चर्चेतून प्रश्न सुटतात, यावर आमचा विश्वास आहे. या राज्यात शांतता राहावी अशी आमची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

 

संजय राऊत हा वेडा माणूस फार जास्त वेडा आहे. पंधराशे रुपयांमध्ये घर चालत नाही. हे आम्हालाही मान्य आहे. मात्र आमची ते तरी देण्याची तुमची दानत आहे?

 

तुम्ही काय दिलं? ते आधी सांगा. नाचता येईना अंगन वाकडं हा प्रश्न, बहिणीला दिलं भावाला देतोय तुम्ही काय दिलंय. सरकारच्या योजनेचा आम्हाला फायदा होतो ही सामान्यांची भूमिका आहे,

 

असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांच्या ‘लाडकी बहीण योजने’वरील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभेत काय निकाल लागले सगळ्यांना माहित आहेत.

 

स्वत; शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी महिलांसाठी काय केलं हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारावा, असंही ते म्हणाले.

 

संजय राऊत कधी लोकांना भेटत नाही कधी ग्राउंडवर जात नाही. 288 पैकी 290 जागा जिंकू शकतात. त्यांचा काही भरोसा नाहीये.

 

एक वेळ काँग्रेसच्या जागा वाढतील पण उभाटाच्या जागा या विधानसभेमध्ये वाढणार नाही. विधानसभेमध्ये काँग्रेस आणि उभाटाची युती होणार नाही.

 

काँग्रेसवाले वाटाशी बोलत सुद्धा नाही. शरद पवार जेव्हा खांदा झटकतील. तेव्हा हे सगळे पाय खाली दिसतील. शिवसेनेचा स्वाभिमान ‘सिल्वर ओक’च्या दाराशी उभा आहे. यांनी जाती-जातीत विष पेरलं आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.

 

राज्यमंत्रिमंडळ विस्तारावरही शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की, मंत्रिमंडळाचा

 

विस्तार होईल याचा अर्थ विस्तार होईल. पण तो कधी होईल ही वेळ कुणी सांगू शकत नाही, असं शिरसाटांनी सांगितलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *