ठाकरेंची शिवसेना 288 जागा लढणार ?महाविकास आघाडीचे काय होणार ?

Thackeray's Shiv Sena will contest 288 seats? What will happen to Mahavikas Aghadi?

 

 

 

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत ट्रायडेंट हॉटेलमध्ये एक बैठक घेतली. दरम्यान,

 

 

या बैठकीत उद्धव ठाकरेंची 288 जागा लढण्याची तयारी असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षांतील नेत्यांसोबत चर्चा करत 288 जागांचा आढावा घेतला.

 

उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत लढवली होती. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढणार आहेत.

 

 

दरम्यान, महाविकास आघाडीसोबत राहून विधानसभा निवडणूक लढवल्यास आपल्या पारंपारिक आणि ताकद असलेल्या जागांवर निवडणूक लढावी लागणार आहे.

 

मुंबई, कोकण आणि मराठवाडा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. दरम्यान, काँग्रेस आणि शरद पवारांना किती जागा सोडल्या जाऊ शकतात,

 

याबाबत ट्रायटेंड हॉटेलवर विचारविनिमय झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत 90/90/90 चा फॉर्म्युला चर्चेत आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात यावा, अशी महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचा विचार आहे.

 

देशपातळीवर कोणाच्या किती जागा?
राष्ट्रीय लोकशाही आघाडी – 294
इंडिया आघाडी – 232
इतर – 17

 

 

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी – 30 + 1 अपक्ष
महायुती – 17

 

 

 

महायुतीतीचे महाराष्ट्रातील पक्षीय बलाबल

भाजपच्या 9 जागा – (स्मिता वाघ, रक्षा खडसे, उदयनराजे भोसले, पियुष गोयल, नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, अनुप धोत्रे, नितीन गडकरी, हेमंत सावरा)

 

 

शिंदेंची शिवसेना – 7 जागा – (श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रवींद्र वायकर, संदीपान भूमरे, नरेश म्हस्के)

 

 

 

अजित पवारांची 1 जागा – सुनील तटकरे

महाविकास आघाडीचे
महाराष्ट्र
ातील पक्षीय बलाबल
काँग्रेस – 13

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार -8

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – 9

 

 

 

दरम्यान, उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांचे हे विधान सध्या चर्चेत आहे.

 

 

मातोश्रीवर आलेल्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांचे मातोश्रीवर आदरातिथ्य उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केलं.

 

 

शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद पुन्हा एकदा चर्चेत आलेत आहेत. त्यांनी मातोश्रीवर जात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

 

त्यांनी नुसती भेटच घेतली नाही तर त्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगलीय.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *