निवडणुकीपूर्वीच शरद पवारांचा मंत्री फायनल? ,दिले संकेत

Sharad Pawar's ministerial final before the election? , signaled

 

 

 

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर नवीन नेतृत्वाला संधी मिळाली आहे.

 

अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात येत आहे. नव्या दमाचे नेतृत्व ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी कितपत सक्षम आहे याचे प्रयोग आणि चाचपणी सुरू आहे.

 

त्यातच आता पवार घराण्यातून नवे नेतृत्व समोर येत आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच याविषयीचे संकेत दिले आहे. रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठी जबाबदार मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

 

पाच वर्षात या भागात काय बद्दल झाला हे तुमच्यासमोर आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी भाग, पाणी, वीज, दळणवळणाची साधन नाही.

 

मी विचारलं लोक खांद्यावर जबाबदारी का टाकतील, मात्र जर संकटाचा सामना करण्याची ताकद हवी ती रोहितमध्ये आहे. त्याच्यावर टीका होत आहे भूमिपुत्र पाहिजे,

 

कसला भुमिपूत्र? तुम्ही मंत्री होतात मात्र काही केलं नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला. अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

रोहित पवार यांची पहिली पाच वर्ष तुमची सेवा करण्यात पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यात जातील असे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.

 

इंदिरा गांधी नगर दक्षिणचा दुष्काळी दौरा करायला आल्या होत्या. आता चित्र पालटलं आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. रोहित पवारांनी 2700 कोटींचा निधी या मतदार संघात आणला.

 

जलसंधारणासाठी 300 कोटी रुपये आणले, हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांनी रोहित पवार यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *